Uddhav Thackeray Group | ठाकरे गटाला पुन्हा ‘दे धक्का’; डॉ. नीलम गोऱ्हे शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Uddhav Thackeray | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shivsena – Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाला पुन्हा धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) शिवसेनेत प्रवेश (Shiv Sena) (शिंदे गट) करणार आहेत. त्याचबरोबर, आजच यांच्यासह काही महत्त्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मोठा धक्का मानला जात आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या उपनेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आज दुपारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. नीलम गोऱ्हेंसह आणखी दोन पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. शुक्रवारी दुपारीच हा प्रवेश होणार असल्याची माहिती आहे.

काही दिवसांपूर्वीच शिवसेना नेत्या मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी शिंदे गटात प्रवेश केला. मनीषा कायंदेंनी शिंदे गटात प्रवेश करताच त्यांच्यावर विश्वास दाखवत एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) मोठी जबाबदारीही सोपवली. एकनाथ शिंदेनी मनिषा कायंदेंची शिवसेना सचिव आणि पक्षप्रवक्तेपदी नियुक्ती केली. नुकतेच आदित्य ठाकरेंचे (Aditya Thackeray) निकटवर्तीय राहुल कनाल (Rahul Kanal) यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Web Title :  Uddhav Thackeray Group | legislative council mla neelam gorhe enter in shivsena shinde group uddhav thackeray vs eknath shinde

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Constable Suicide News | पुण्यात पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत केली आगळी वेगळी मागणी

Maharashtra Local Body Election | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार; निवडणूक आयोगाचे मोठे संकेत

Maharashtra Local Body Election | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार; निवडणूक आयोगाचे मोठे संकेत

Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात किंचित घसरण; जाणून घ्या आजचा पुण्यातील दर

Petrol-Diesel Price Today | तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव काय? जाणून घ्या आजचे दर

Maharashtra State Election Commission | राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा नाही