Anil Patil | ‘काही दिवसांनंतर पूर्ण राष्ट्रवादीच आमच्याकडे’; मंत्री अनिल पाटलांचा मोठा दावा

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Anil Patil | आताच 44 प्लस आहे, आगे आगे देखो होता है क्या. काही दिवसांनंतर पूर्णच राष्ट्रवादी काँग्रेस आमच्याकडे येईल, असा मोठा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (अजित पवार गट) आणि कॅबिनेट मंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांनी केला आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अनिल पाटील यांचे पहिल्यांदाच जळगावात (Jalgaon News) आगमन झाले. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

अनिल पाटील (Anil Patil) म्हणाले की, “स्वप्नातही विचार केला नव्हता की मंत्रिपद मिळेल. ज्या दिवशी शपथविधी झाला, त्या दिवशी माझी आई शेतात गेली होती, छोटा कार्यकर्ता हा मंत्रिपदापर्यंत पोहोचला आहे. ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. अमळनेर तालुक्याच्या 75 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रिपद मिळाल आहे आणि ते मला मिळाले त्याचा मोठा आनंद आहे. अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे , प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून ही संधी प्राप्त झाली.”

पुढे ते म्हणाले, “जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी काय काय करता येईल, त्यामुळे अजित पवार यांच्यासारख्या नेत्यांनी माझ्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे. येणाऱ्या काळामध्ये सकारात्मक चित्र दिसेल. एक नंबरचा पक्ष राष्ट्रवादी कसा होईल, यासाठी प्रयत्न करणार आहे.” तसेच आगे आगे देखो होता है क्या. आताच 44 प्लस आहे, यापुढे तो 46, 47,48 होईल. पुढे मला असे वाटते की पूर्ण राष्ट्रवादीच आमच्याकडे येईल. पण आज 44 प्लस हा आमचा आकडा आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.

Web Title :  Anil Patil | now its 44 plus after a few days we will have a complete ncp says minister anil bhaidas pati

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Constable Suicide News | पुण्यात पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत केली आगळी वेगळी मागणी

Maharashtra Local Body Election | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार; निवडणूक आयोगाचे मोठे संकेत

Maharashtra Local Body Election | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार; निवडणूक आयोगाचे मोठे संकेत

Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात किंचित घसरण; जाणून घ्या आजचा पुण्यातील दर

Petrol-Diesel Price Today | तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव काय? जाणून घ्या आजचे दर

Maharashtra State Election Commission | राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा नाही