Lok Sabha Election 2024 | जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची मुळशी परिसरातील मतदान केंद्रांना भेट

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Lok Sabha Election 2024 | जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे (IAS Suhas Diwase) यांनी मुळशी परिसरातील विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन तेथील सुविधांचा आढावा घेतला. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे, सोबत उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले, मुळशी तहसीलदार रणजित भोसले, पोलीस निरीक्षक मनोज कुमार यादव आदी उपस्थित होते.

डॉ. दिवसे म्हणाले, मतदान केंद्रांवर मतदारांना आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. मतदारांना कोणताही त्रास होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. ज्या ठिकाणी पाच ५ पेक्षा अधिक मतदान केंद्र आहेत, अशा ठिकाणी मतदारांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबाबत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

डॉ.दिवसे यांनी यावेळी कासार आंबोली येथील साहित्य वाटप व स्वीकृती केंद्राची पाहणी केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Accident News | भरधाव कार उलटल्याने महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू, मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील घटना

Rohit Pawar On Maharashtra Mahayuti Govt | अटी शर्ती बदलून सत्ताधाऱ्यांनी आदिवासी आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या दूध व पोषण आहार पुरवठ्यामध्ये 400 कोटीं रुपयांची दलाली खाल्ली; आमदार रोहित पवार यांनी पुराव्यानिशी केलेल्या आरोपांनी खळबळ

Pune Hadapsar Crime | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, आरोपी गजाआड