Pune Accident News | भरधाव कार उलटल्याने महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू, मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Accident News | भरधाव वेगात जाणाऱ्या कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार उलटली. या अपघातात एका महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात गुरुवारी (दि.21) रात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील (Mumbai Bangalore Bypass Road) सुतारवाडी, पाषाण (Sutarwadi Pashan) येथील स्वराज चौकात झाला. अथर्व भाऊसाहेब जगताप (वय-22 रा. हिंगणे खुर्द, सिंहगड रोड, पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.(Pune Accident News)

याबाबत पोलीस हवालदार आदेश संदेश कदम (वय-38) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshrungi Police Station) फिर्याद दिली आहे.
यावरुन अथर्व जगताप याच्यावर आयपीसी 279, 304(अ), मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारचालक अथर्व मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास क्रेटा कार (एमएच 12 एसएल 7224)
मधून मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरून वाकड येथून कात्रजच्या दिशेने भरधाव वेगात जात होता.
अथर्वने त्याच्या ताब्यातील कार हयगयीने व अत्यंत भरधाव वेगात चालवल्याने त्याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने
पाषाण मधील सुतारवाडी परिसरात कार उलटली. यामध्ये अथर्व गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात
दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Lok Sabha Election 2024 | पुणेकर आता फसणार नाहीत तर जिंकणार आहेत; काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या भावना, उमेदवारी जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी आनंदोत्सव (Video)

MPSC Exam Postponed | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 28 एप्रिल व 19 मे रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली

Pune Police News | पुणे: खाजगी वाहनाला पोलीस वाहनासारखी रंगरंगोटी करुन शासकीय कामासाठी वापर केला जात असल्याचा आरोप, माहिती अधिकारात पोलिसांचा ‘प्रताप’ उघड; संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी

Pimpri Murder Case | पिंपरी : मोबाईल चोरल्याच्या संशयावरुन बेदम मारहाण करुन खून