Lok Sabha Election 2024 | काँग्रेस नागपुरातून फुंकणार लोकसभेचे रणशिंग, महारॅलीसाठी नेत्यांची लगबग

नागपूर : Lok Sabha Election 2024 | येत्या २८ डिसेंबर रोजी काँग्रेसचा वर्धापन दिन (Congress Anniversary) असून त्यानिमित्त नागपुरात महारॅलीचे (Congress Maharally) आयोजत करण्यात आले आहे. या महारॅलीसाठी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge), ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi), राहुल गांधी (Rahul Gandhi), प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) व देशभरातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. महारॅलीच्या नियोजनासाठी राज्यातील मोठ्या नेत्यांच्या हालचाली आणि बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. दरम्यान, महारॅलीच्या माध्यमातून काँग्रेसने नागपुरातुन लोकसभेचे (Lok Sabha Election 2024) रणशिंग फुंकण्याचे संकेत दिले आहेत.

सोमवारी रात्री याचसाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्याकडे बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan), पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan), प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी हे बैठकीला उपस्थित होते. यात सभा स्थळाबाबत प्राथमिक चर्चा झाली.

यानंतर नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री डॉ. सतीश चतुर्वेदी, डॉ. नितीन राऊत, विकास ठाकरे, नाना गावंडे व अन्य नेत्यांनी नागपुरातील दाभा येथील मैदानाची मंगळवारी सकाळी पाहणी केली.

मागील आठवड्यात सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल व मुकुल वासनिक यांनी बैठक घेऊन महारॅलीच्या तयारीची सूचना
केली होती. यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व अन्य नेत्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत.
सभेसाठी दहा लाख लोक जमविण्याचे काँग्रेसचे टार्गेट आहे. (Lok Sabha Election 2024)

नागपुरमधील सर्वात मोठे कस्तुरचंद पार्क सध्या सभेला देण्यात येत नसल्याने काँग्रेसने नव्या मैदानाचा शोध सुरू केला आहे.
महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा ज्या ठिकाणी झाली ते नंदनवनमधील केडीके कॉलेजजवळील मैदान
महारॅलीच्यादृष्टीने लहान असल्याने त्याचा विचार होऊ शकला नाही.

दरम्यान, काँग्रेस नेत्यांनी मंगळवारी सकाही ज्या दाभा येथील मैदानाची पाहणी केली ते सभेसाठी निश्चित होण्याची
शक्यता आहे. हे मैदान रिंगरोडला लागून असून चारही दिशांनी वाहनांना ये-जा करण्यास सोयीचे आहे.
येथे पार्किंगची व्यवस्था चांगली आहे. या मैदानासह डिगडोह येथील प्रियदर्शनी कॅम्पसचे भव्य मैदान तसेच उमरेड
रोडवर दिघोरीच्या पुढील मैदानाचाही विचार केला जात आहे.

सभा स्थळासाठी राहुल गांधी यांच्या टीमने पाहणी केल्यानंतर शिक्कामोर्तब होऊ शकते.
सुरक्षा आणि तयारीच्यादृष्टीने बुधवारी दुपारपर्यंत मैदानात निश्चित झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police-Tarang 2023 | तरंग-2023: पुणेकरांची सुरक्षितता आणि कला संस्कृतीचा अनोखा मेळावा; सोहळ्यासाठी मोफत प्रवेश असणार

Ravikant Tupkar | सरकारच्या बुडाखाली आग लावणार, हजारो शेतकरी नागपुरच्या विधानभवनात घुसणार, रविकांत तुपकारांचा इशारा

Pune Pimpri Chinchwad Crime News | पार्किंग दिल्याचे भासवून सभासदांची फसवणूक, पिंपरी मधील बिल्डरवर MOFA

49 Opposition MP Supspended | विरोधी खासदारांवर निलंबनास्त्राचा मारा ! सुप्रिया सुळे, शशी थरूरांसह 49 जण निलंबित, आतापर्यंत 141 जण ‘आऊट’