Pune Pimpri Chinchwad Crime News | पार्किंग दिल्याचे भासवून सभासदांची फसवणूक, पिंपरी मधील बिल्डरवर MOFA

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | मोशी येथील स्वप्नलोक हौसिंग सोसायटीच्या सभासदांना पार्किंग न देता सर्वांच्या टॅक्स पावतीवर पार्किंग दिल्याचे भासवून फसवणूक केल्या प्रकरणी गृहप्रकल्पाच्या डेव्हलपर्स (Developers) यांच्याविरुद्ध मोफा अ‍ॅक्ट अन्वये एमआयडीसी भोसरी पोलीस (PCPC Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार डिसेंबर 2015 ते आजपर्यंत स्वप्नलोक हौसींग सोसायटी (Swapnalok Housing Society) मोशी येथे घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत ईश्वर भगवान रासकर (वय-53 र स्वप्नलोक हौसींग सोसायटी, मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात (MIDC Bhosari Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन मोरवाडी पिंपरी येथील तुलीप प्रॉपर्टीज (Tulip Properties), अक्रम झाहील उल्ला चौधरी, भरत लालराम चौधरी, बाबुलाल पुनाराम चौधरी यांच्यावर आयपीसी 406, 420, 467, 468, 471, 34 सह महाराष्ट्र ओनरशिप अॅक्ट (Maharashtra Ownership Flats Act (Mofa Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे स्वप्नलोक हौसिंग सोसायटीचे चेअरमन आहेत.
आरोपी डेव्हलपर्स यांनी 2015 पासून स्वप्नलोक गृहप्रकल्पाचा (Housing Projects) डेव्हलपमेंट चार्जेसचा हिशोब
दिला नाही. सोसायटी स्थापन करुन न देता सोसायटी स्थापन करण्यापूर्वी कॉमन लाईट बील, पाणीपट्टी बिल भरले नाही.
तसेच सोसायटीचे कन्व्हेयन्स डीड (अभिहस्तांतरण पत्र) करुन दिले नाही. याशिवाय फ्लॅटची विक्री करताना माहिती पुस्तकात दिलेल्या सुविधा देखील आरोपींनी दिलेल्या नाहीत. तसेच सभासदांना पार्किंग न देता सर्वांच्या टॅक्स पावतीवर पार्किंग दिल्याचे भासवून फिर्यादी व इतर सभासदांची फसवणूक (Fraud) करुन दिलेल्या पैशांचा अपहार केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Google वर उच्चभ्रू परिसर सर्च करुन घरफोडी, येरवडा पोलिसांकडून परराज्यातील हायटेक चोरट्याला अटक; 3 गुन्हे उघड

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून, पतीला अटक; पिंपरी चिंचवडमधील घटना

NCP MP Supriya Sule | जनतेचा आवाज दडपाण्याचे पाप हे सरकार करतंय, ही तर अघोषित आणीबाणी : सुप्रिया सुळे