Lok Sabha Election 2024 | मतदान यादीत नाव नसल्यास नमुना क्र. 17 चा अर्ज भरून आणि आपले मतदार ओळखपत्र दाखवून मतदान करता येणार असल्याचा संदेश दिशाभूल करणारा

मतदानाच्या अनुषंगाने दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहण्याचे निवडणूक प्रशासनाचे आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Lok Sabha Election 2024 | मतदान यादीत नाव नसल्यास नमुना क्र.१७ चा अर्ज भरून आणि आपले मतदार ओळखपत्र दाखवून मतदान करता येणार असल्याचा दिशाभूल करणारा संदेश पसरविले जात असल्याचे निदर्शनास आले असून अशा संदेशांपासून सावध रहावे, अफवांवर विश्वास ठेऊ नये तसेच असे संदेश पुढे पाठवू नयेत, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाने केले आहे.(Lok Sabha Election 2024)

मतदार यादीत नाव नसतानाही नावे यादीतून वगळलेली असलेल्या नागरिकांनी मतदान केंद्रावर जावून अर्ज क्र.१७ भरावा.
असे नागरिक मतदार ओळखपत्र दाखवून मतदान करू शकणार असल्याने ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत त्यांनी
मतदान केंद्रावर जावून त्वरीत पुढील प्रक्रीया करावी, असा संदेश भ्रमणध्वनीवरून देण्यात येत आहे.
अशा दिशाभूल करणाऱ्या माहितीवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये, अशी चुकीची माहिती पसरविणाऱ्यांविरुद्ध कठोर
कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shirur-Pune Lok Sabha | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 11 मे रोजी सायंकाळी 6 वाजेपासून 13 मे रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बेकायदेशीर जमाव तसेच सार्वजनिक सभा बैठका घेण्यास बंदी

Maval Lok Sabha | मावळ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ! पात्र मतदारांनी या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदान करावे- दीपक सिंगला