Pune Hadapsar Crime | पुणे : आर्थिक व्यवहारातून युवकाचे अपहरण, सोलापूर येथे नेऊन लुटले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Hadapsar Crime | आर्थिक व्यवहारातून एका युवकाचे जबरदस्तीने अपहरण (Kidnapping Case) करुन सोलापूर (Solapur) येथे नेले. त्याठीकाणी युवकाच्या खिशातील रोख रक्कम जबदस्तीने काढून घेत लुटल्याचा (Robbery Case) प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) एका व्यक्तीवर अपहरण व जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बुधवारी (दि.13) सायंकाळी साडेसात ते गुरुवारी (दि.14) दुपारी दीडच्या दरम्यान हडपसर परिसरातील अ‍ॅमनोरा पार्क (Amanora Park Town) येथे घडला आहे.

याबाबत प्रविण विनोद काळे (वय-36 रा. बोरकर चाळ, सिद्धिविनायक कॉलनी, सातववाडी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी स्वप्नील शेटकर (वय-34 रा. अ‍ॅड्रीनो टॉवर, अ‍ॅमनोरा पार्क टाऊन, हडपसर) याच्यावर आयपीसी 392, 363, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपीकडून पैसे घेतले आहेत. याच आर्थिक व्यवहारातून आरोपीने शिवीगाळ करुन धमकी दिली. तसेच आरोपीने त्याचा साथीदार नितीन संकद याच्या मदतीने फिर्यादी यांना पोलो कार मध्ये जबरदस्तीने बसवून सोलापूर येथे नेले. त्याठिकाणी स्वप्नील याने फिर्य़ादी यांच्या खिशातील अडीच हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याचे फिय़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.(Pune Hadapsar Crime)

पैसे मागितल्याच्या कारणावरून महिलेला मारहाण

वाघोली : अ‍ॅटोरिक्षाचे लायसन्स काढण्यासाठी दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरुन महिलेचा गळा दाबून
मारहाण केली. तसेच कात्रीने महिलेच्या हातावर वार करुन जखमी केल्याची घटना वाघोली (Wagholi) परिसरात घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि.14) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी साधना मनोज पवार (वय-45 रा. उबाळेनगर, वाघोली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन सनी टीमारेड्डी जंगले (वय-25 रा. ताडीवाला रोड, पुणे) याच्यावर आयपीसी 324, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी यांनी आरोपीला अ‍ॅटो रिक्षाचे लायसन्स काढण्यासाठी पैसे दिले होते. मात्र, आरोपीने लायसन्स काढून दिले नाही.
गुरुवारी सायंकाळी आरोपी महिलेच्या घरी आला होता.
त्यावेळी महिलेने लायसन्ससाठी दिलेल्या पैशांचे काय केले अशी विचारणा करुन पैसे परत मागितले.
आरोपीने चिडून महिलेचा गळा पकडून हाताने मारहाण केली. तसेच कात्रीने हातावर वार करुन जखमी केले.
शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Lonikand Crime | प्रवासी महिलेसोबत कारमध्ये गैरवर्तन, उबेर चालकावर गुन्हा दाखल; लोणीकंद परिसरातील घटना