Lok Sabha Election In Maharashtra | महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांसाठी अर्ज भरण्यासाठी शुक्रवार पासून सुरुवात

मुंबई: Lok Sabha Election In Maharashtra | लोकसभा निवडणुकीचे तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी होत असून यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. राज्यातील बारामती, रायगड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी—सिंधुदूर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या जागांसाठी या दिवशी मतदान होईल.

तिसऱ्या टप्प्यात १२ राज्यांतील ९४ जागांसाठी मतदान होणार आहे. यात महाराष्ट्रातील ११ मतदारसंघांचा समावेश आहे.

१२ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील ९४ जागांसाठीची अधिसूचना शुक्रवार काढली जाणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले.(Lok Sabha Election In Maharashtra)

तिसऱ्या टप्प्यासाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १९ एप्रिल असून २० एप्रिलला अर्जांची छाननी केली जाईल.
२२ एप्रिलला अर्ज मागे घेण्याचा शेवटची मुदत आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील ११ जागांसोबत गुजरातमधील २६, कर्नाटकमधील १४ उत्तर प्रदेशातील १० मध्य प्रदेशातील ८ छत्तीसगडमधील ७ बिहारमधील ५ आसाम आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी ४ गोवा राज्यातील २ दादरा नगर हवेली, दमन आणि दीवमधील प्रत्येकी २ व जम्मू काश्मीरमधील एका जागेवर मतदान होणार आहे.

मध्य प्रदेशातील बैतूल मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार होते.
तथापि याठिकाणी अर्ज भरलेल्या बसपाच्या उमेदवाराचे निधन झाल्याने याबाबत वेगळी अधिसूचना शुक्रवारी
काढली जाणार असल्याची माहितीही आयोगाकडून देण्यात आली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : कौटुंबिक कारणावरुन पत्नीला मारहाण, जाब विचारणाऱ्या दोघांवर चाकूने वार; एकाला अटक

Amol Kolhe On BJP Govt | डॉ. अमोल कोल्हे यांनी भाजपावर उगारला टीकेचा ‘आसूड’, केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे कांदा, सोयाबिन, दूध उत्पादक शेतकरी…