पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी नव्हे ‘या’ मतदारसंघातून लढणार लोकसभा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तस तशी या निवडणुकी बद्दल उलट सुलट चर्चा रंगू लागली आहे. नरेंद्र मोदी कोणत्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार हा एक प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात असून आगामी काळात या प्रश्नाचे उत्तर नीटसे मिळू शकणार आहे. मात्र नरेंद्र मोदी या हि वेळी दोन ठिकाणी निवडणूक लढून दोन राज्यामध्ये भाजपचा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करणार आहेत अशी माहिती दिल्लीतील सूत्रांनी दिली आहे. त्याच प्रमाणे नरेंद्र मोदी उत्तर प्रदेश या राज्याबरोबर ओडिसा राज्यातून निवडणूक लढू शकतात अशी माहिती भाजपचे खासदार प्रदीप पुरोहित यांनी माध्यमांना दिली आहे.

ओडीसातील या मतदारसंघातून मोदी लढवणार लोकसभा निवडणूक

नरेंद्र मोदी ओडिसातील पुरी या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. पुरी हा मतदारसंघ नरेंद्र मोदी यांच्या साठी सुरक्षित मतदारसंघ असणार आहे कारण या मतदारसंघात उभा राहिल्यास नरेंद्र मोदी निवडून येण्याची शक्यता अधिक आहे. कारण पुरी या शहराचे वातावरण हिंदू धार्मिक असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची या मतदारसंघात घट्ट वीण आहे. म्हणून या ठिकाणी नरेंद्र मोदी सहज मैदान जिंकण्याची शक्यता आहे.

सध्या हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात नाही

गतवेळी मोदी हे भाजपच्या बालेकिल्ल्यात म्हणजे वाराणशी मध्ये जाऊन उभे राहिले होते. त्याठिकाणी भाजपचे मुरली मनोहर जोशी निवडून येत होते. भाजपच्या बालेकिल्ल्यातच मोदी निवडणूक लढवतात अशी टीका सुद्धा त्यांच्यावर विरोधी पक्षातील नेत्यांनी केली होती. या सर्व टीकेची पुनरावृत्त होऊ नये म्हणून नरेंद्र मोदी यांनी जगन्नाथ पुरीची निवड केली आहे. या ठिकाणी सध्या बिजू जनता दलाचे पिनाकी मिश्र हे खासदार आहेत.

नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अरविंद केजरीवाल निवडणूक लढणार नाहीत

गत वेळी नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवून अरविंद केजरीवाल यांनी चांगलेच वादळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या वेळी नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अरविंद केजरीवाल निवडणूक लढवणार नाहीत असे  आपचे खासदार संजय सिंह यांनी जाहीर केले आहे. अरविंद केजरीवर दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. त्या पदाची जबाबदारी सांभाळण्यात ते व्यस्थ आहेत असे आपचे खासदार संजय सिंह यांनी म्हणले आहे.

नरेंद्र मोदी कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवणार हे मात्र निश्चित नसले तरी येत्या काळात या बाबत रणनीती अधिक स्पष्ट होणार आहे. तर अमित शहा यांनी नरेंद्र मोदी हे वाराणसी मधून निवडणूक लढवणार आहेत असे स्पष्ट केले आहे.