वंचित बहुजन आघाडीकडून एकाचवेळी ३७ उमेदवारांची घोषणा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेस राष्ट्रवादीसोबत वंचित बहुजन आघाडी हात मिळवणार अशी चर्चा होती मात्र वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. वंचित बहुजन आघाडीची पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत ३७ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यात ११ मतदारसंघ वगळता इतर मतदार संघाची यादी जाहीर करण्यात आली आहे. पत्रकार परिषद घेऊन ही उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली.

यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं एमआयएमनं आधीच स्पष्ट केलंय. परंतु, त्यांना विश्वासात घेऊन मुंबईतील तीन जागांबाबत निर्णय घेतला जाईल, असं आंबेडकर म्हणाले. तसंच, अकोला आणि सोलापूरचा उमेदवारही लवकरच निश्चित होईल, असं त्यांनी सांगितलं. वंचित बहुजन आघाडीच्या यादीत उमेदवाराच्या नावापुढे त्याची जातही नमूद करण्यात आली आहे. सर्वच वंचित घटकांना प्रतिनिधित्व दिल्याचं या यादीत पाहायला मिळतं.

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची यादी

फेज -१

वर्धा–धनराज वंजारी
रामटेक– किरण रोडगे-पाटणकर
भंडारा-गोंदिया–एन के नन्हे
गडचिरोली-चिमूर –डॉ रमेश गजबे
चंद्रपूर–ऍड राजेंद्र महाडोळे
यवतमाळ–वाशिम -प्रो प्रवीण पवार

फेज-२
बुलढाणा– बळीराम सिरस्कार
अमरावती– गुणवंत देवकरे
हिंगोली– मोहन राठोड
नांदेड– यशपाल भिंगे
परभणी–आलमगीर खान अखिल मोहम्मद खान
बीड– प्राध्यापक विष्णू जाधव
उस्मानाबाद–अर्जुन सलगर
लातूर– राम गारकर

फेज -३
जळगाव– सौ अंजली रत्नाकर बाविस्कर
रावेर– नितीन कांडेलकर
जालना– डॉक्टर शरच्चंद्र वानखडे
रायगड– सुमन कोळी
पुणे– अनिल जाधव
बारामती– नवनाथ पडळकर
माढा– ऍड विजय मोरे
सांगली– जयसिंग शेंडगे
सातारा– सहदेव एवळे
रत्नागिरी-सिंधुदुर्ग– मारुती रामचंद्र जोशी
कोल्हापूर– डॉअरुणा माळी
हातकणंगले– असलम बादशहा जी सय्यद

फेज -४

नंदुरबार– दाजमल गजमल मोरे
दिंडोरी– बापू खेळू बर्डे
नाशिक– पवन पवार
पालघर– सुरेश अर्जुन पडवी
भिवंडी– डॉ ए. डी. सावंत
ठाणे– मल्लिकार्जुन पुजारी
मुंबई दक्षिण– डॉ अनिल कुमार
मुंबई साउथ सेंट्रल– डॉ संजय भोसले
ईशान्य मुंबई– संभाजी शिवाजी काशिद
मावळ– राजाराम पाटील
शिर्डी– डॉक्टर अरुण साबळे