ब्रिटनमध्ये आढळला नवीन प्रकारचा ‘कोरोना’ व्हायरस, बुधवारपासून पुन्हा कडक लॉकडाऊनची घोषणा

लंडन : ब्रिटनमध्ये वेगाने वाढणार्‍या कोरोना व्हायरसच्या प्रकरणांना कोविड-19 च्या एका नवीन प्रकाराला जबाबदार मानले गेले आहे. कोरोना व्हायरसचा हा नवीन प्रकारच ब्रिटन आणि युरोपच्या अनेक देशामध्ये पुन्हा कोरोनाच्या नवीन केसेसच्या वाढीस जबाबदार आहे. कोरोना व्हायरसचा नवीन प्रकार आढळल्याने सध्या लंडन आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात बुधवारपासून कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

आरोग्य मंत्री मॅट हँकॉक यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये खासदारांना सांगितले की, या भागांमध्ये केवळ सात दिवसात या घातक व्हायरसच्या संसर्गाची प्रकरणे दुप्पट दराने वाढत आहेत, यासाठी तात्काळ आणि निर्णायक पावले उचलण्याची आवश्यकता होती. अशावेळी लंडन आणि त्याच्या आजूबाजूच्या भागात ’टीयर-3’ स्तराचे प्रतिबंध लागू करण्यात येतील, ज्याचा अर्थ जवळपास पूर्ण लॉकडाऊनशी आहे. हँकॉक यांनी म्हटले, ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा प्रकार आढळला आहे, जो दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये वेगाने पसरण्याचे कारण असू शकतो. या नवीन प्रकाराशी संबंधित सुमारे 1000 प्रकरणांची ओळख तज्ज्ञांनी पटवली आहे.

वैद्यकीय कर्मचारी सुरू करणार लसीकरण
ब्रिटनमध्ये आरोग्य केंद्रांना सोमवारी कोविड-19 शी सामना करणार्‍या फायजर / बायोएनटेकच्या व्हॅक्सीनची पहिली बॅच मिळण्यास सुरूवात झाली आणि या आठवड्यापासून लस देण्यास सुरू केली जाईल. यापूर्वी ज्येष्ठ आणि पहिल्या फळीतील कोरोना योद्ध्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. राष्ट्रीय आरोग्य सेवा (एनएचएस) नुसार देशात 100 पेक्षा जास्त अशा केंद्रांवर लसीचा पुरवठा केला जात आहे, ज्यामध्ये काहींनी सोमवारपासूनच आपले लसीकरण अभियान सुरू केले आहे.

एनएचएसच्या प्राथमिक आरोग्य देखभाल संचालक डॉ. निक्की कनानी यांनी म्हटले, जनरल प्रॅक्टिशनर्स, नर्स, फार्मासिस्ट आणि अन्य प्राथमिक आरोग्य देखभाल कर्मचारी कोरोना व्हायरसपासून लोकांना वाचवण्याच्या अभियानात सहभागी होण्यास उत्सुक आहेत. त्यांनी म्हटले की, हा एनएचएसद्वारे राबवण्यात येणारे आतापर्यंतचे सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम असेल.

अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठे लसीकरण अभियान सुरू
तर अमेरिकेच्या इतिहासात सर्वात मोठे लसीकरण अभियान सोमवारी सुरू झाले. औषध कंपनी फायजर आणि जर्मनीची त्यांची सहायक कंपनी बायोएनटेकद्वारे विकसित कोविड-19 ची लस आरोग्य कर्मचार्‍यांना देण्यास सुरूवात झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेत आतापर्यंत तीन लाख लोकांचा मृत्यू झाला आहे आणि सर्वात जास्त संसर्गाची प्रकरणे येथे आली आहेत. न्यूयॉर्क सिटीमध्ये एका नर्सला सोमवारी सकाळी फायजर-बायोएनटेकचा पहिला डोस देण्यात आला. न्यूयॉर्कच्या लाँग आयलँड जेविश मेडिकल सेंटरमध्ये अतिदक्षता विभागातील नर्स सँड्रा लिंडसे यांनी सांगितले, आज मला आशेचा किरण दिसत आहे. राज्याचे गव्हर्नर अँड्रयू क्यूमो यांनी लाइव्हस्ट्रीमद्वारे लसीकरण अभियानावर लक्ष ठेवले.