अखेर लोणीकंद व लोणीकाळभोर पोलीस ठाणे पुणे पोलीस आयुक्तालयात ‘समाविष्ट’; ‘कारभार’ 2 दिवसांपासून सुरु होणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लोणीकंद व लोणी काळभोर पोलीस ठाणे अखेर पुणे पोलीस आयुक्तालय येथे समाविष्ट करण्यात आले आहे. आता हे पोलीस ठाणे दोन दिवसात पुणे पोलीस आयुक्त यांच्या “अंडर” सुरू होतील. तर उर्वरित पोलीस ठाणे देखील लवकरच सुरू होतील, असे सांगण्यात आले आहे.

शहर पोलीस आयुक्तालयातून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरू झाले आहे. यानंतर पुणे शहर दलात हद्दीत बदल झाला. तसेच काही ग्रामीण पोलीस ठाणे यांच्यातील दोन पोलीस ठाणे पुण्यात समाविष्ट केले जात आहेत. लोणीकंद आणि लोणी काळभोर हे ठाणे समाविष्ट होणार होती. शासन दरबारी याची प्रोसेस सुरू होती. दरम्यान आज शासनाने याचा अंतिम आदेश जारी केला आहे. त्यानुसार शहर पोलीस दलात हे पोलीस ठाणे पुणे पोलीस आयुक्त यांच्या अंडर येणार आहेत. येत्या दोन दिवसात या पोलीस ठाण्याचे काम सुरू होईल, असे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.

दरम्यान यासोबतच इतर चार पोलीस ठाणे सुरू करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. तेही पोलीस ठाण्याचे काम लवकरच सुरू होतील, असे सांगण्यात आले आहे. काळेपडळ, खराडी, नांदेडसीटी, बाणेर अशी ही पोलीस ठाणे सुरू होणार आहेत.