लोणीकंद पोलिसांकडून जबरी चोरी प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक

शिक्रापुर : मांजरी खुर्द ते वाघोली रोडवर धारदार शस्त्रांचा धाक दाखवून झालेल्या जबरी चोरीतील मुख्य आरोपीस लोणीकंद पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली आहे. याबाबत सविस्तर असे कि,लोणीकंद पोलीस स्टेशन येथे येथे दि. 30जानेवारी रोजी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्यात आरोपी अभिजित उर्फ अभ्या महादेव कांबळे (रा.72 घरकुल, मांजरी बुद्रुक, ता हवेली) यास दिनांक 30/01/2021 रोजी अटक करण्यात आली होती.या अटक केलेल्या आरोपीवर लोणीकंद,.हडपसर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहेत.तसेच सदरच्या गुन्ह्यातला दुसरा व पाहिजे आरोपीचा शोध सुरू होता. लोणीकंद पोलिसांनी तपास करत असताना तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी मयूर ज्ञानेश्वर पारधे (वय 24 वर्षे, रा. मांजरी बुद्रुक राम मंदिराजवळ, ता. हवेली, पुणे मुळ गाव – ४ नंबर शाळेजवळ, आळंदी पुणे) यास शिताफीने सापळा रचून कुरकुंभ पाटस येथील हॉटेल गणेश च्या पाठीमागील मुकदम वाडी येथून ताब्यात घेण्यात आले.आरोपीस अटक करू. गुन्ह्यात वापरलेला कोयता,गुन्ह्यातील गेला मुद्देमाल, यापैकी रेडमी कंपनीचा मोबाईल हँडसेट, गाडीची चावी, atm कार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदरील आरोपीवर शिक्रापूर, आळंदी देवाची,आळंदी देवाची, हडपसर पोलिस स्टेशन मध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत हा तपास पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील सो, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील, लोणीकंद चे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शना खाली सहा. पोलीस निरीक्षक मनोज नवसरे, पोलीस उपनिरिक्षक हणमंत पडळकर, पोलीस उपनिरिक्षक विक्रम जाधव, गुन्हे शोध पथकाचे बाळासाहेब सकाटे, श्रीमंत होनमाने, दत्ता काळे, समीर पिलाने, ऋषिकेश व्यवहारे, योगेश भंडारे यांनी केला आहे.