भगवान देता है तो छप्पर फाडके, वीटभट्टी मजुराला दीड कोटींची लॉटरी

संगरूर : वृत्तसंस्था

पंजाबमधील संगरूर जिल्ह्यातील वीटभट्टी कामगार मनोज कुमार आणि त्याची पत्नी राज कौर यांना चक्क दीड कोटी रूपयांची लॉटरी लागली आहे. हातावरचे पोट असणाऱ्या आणि दिवसाला अवघे २५० रुपये कमावणाऱ्या या दाम्पत्याचे आयुष्य अचानक बदलून गेले आहे.
[amazon_link asins=’B07CRMPS35,B001FWYGJS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4dd89e4e-b7dc-11e8-bbe1-f3296eab6521′]

लॉटरीचे हे तिकीटही मनोज कुमारने उधारीवर घेतले होते. शेजाऱ्याकडून २५० रुपये घेऊन त्याने हे तिकीट विकत घेतले होते. लॉटरी जिंकल्याचे समजताच मनोज कुमारच्या घरी प्रॉपर्टी डीलर आणि बँकर्सची रांग लागली आहे. ३० ऑगस्टला पोस्ट ऑफिसचे कर्मचारी मनोज कुमारच्या घरी आले आणि त्यांनी त्याला लॉटरी लागल्याची माहीती दिली. त्यांनी वर्तमानपत्रही दाखवले आणि मनोजकुमारला तिकीट आणण्यास सांगितले. पँटच्या खिशातून त्याने तिकीट काढले आणि क्रमांक तपासला. आता काही दिवसांतच जिंकलेली रक्कम मनोज कुमारला मिळणार आहे. त्याचे वडील पैशांअभावी उपचार न झाल्याने मरण पावले होते. तेव्हा लॉटरी लागली असती तर ते कदाचित वाचले असते, अशी रुखरुख मात्र मनोजकुमारने व्यक्त केली आहे.
[amazon_link asins=’B0751LSRGF,B0751C1WGF’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’593b59d4-b7dc-11e8-84f9-6b58ed5093a2′]

मनोज कुमार मुळ वाल्मिकी समाजातील असून त्याने १० वर्षांपूर्वी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. त्याची मोठी मुलगी याच वर्षी १२ वी पास झाली असून ती नोकरीच्या शोधात आहे. मनोज कुमारला तीन मुली आणि एक मुलगा आहे.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा.

पोलीसनामाला ट्विटरवर फाॅलो कर.

पोलीसनामाचे युट्यूब चॅनेलला सब्सक्राईब करा.

पोलीसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जाॅईन व्हा.