अंबरनाथमध्ये प्रेयसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

अंबरनाथ : पोलीसनामा ऑनलाईन –   प्रियकराचे दुसरे लग्न ठरल्याने प्रेयसी त्याला जाब विचारण्यासाठी त्याच्या घरी गेली होती. त्यावेळी रागाच्या भरात प्रियकराने प्रेयसीची हत्या केली व नंतर स्वतः आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एक महिन्यांपूर्वी विवाहित महिला व तिच्या प्रियकराचा मृतदेह इमारतीच्या एका फ्लॅटमध्ये आढळला होता.

जयंती सहा असे हत्या करण्यात आलेल्या प्रेयसीचे नाव आहे. तर तर संदीप सक्सेना असे आत्महत्या केलेल्या प्रियकराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथमधील एका खासगी कंपनीमध्ये अजित सहा आणि संदीप सक्सेना हे दोघे मित्र काम करत होते. दोघांचेही एकमेकांच्या घरी जाणे येणे होते. यामुळे अजितची पत्नी जयंती व संदीप यांच्यात जवळीक निर्माण होऊन त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले. अशातच संदीपच्या घरच्या मंडळींनी त्याचे दुसरे लग्न ठरविले होते. ही गोष्ट जयंतीला कळल्यानंतर ती संदीपला भेटायला घरी गेली. संदीपच्या लग्नावरून दोघांमध्ये भांडण झाले.

रागाच्या भरात संदीपने जयंतीचे डोके जमिनीवर आपटले, नंतर इलेक्ट्रिक ग्राइंडर सुरू करून तिचा गळा कापला. रक्तस्राव झाल्यामुळे जयंतीचा जागीच मृत्यू झाला. नंतर संदीपने स्वतःचा गळाही ग्राइंडरने कापून आत्महत्या केली. आनंदनगरमधील प्रसादम या गृहसंकुलातील एका फ्लॅटमध्ये संदीप आणि जयंतीचा मृतदेह आढळून आला.