Low Sperm Count | स्पर्म काउंट कमी झाल्यास पुरुषांना असे मिळतात संकेत, खायला सुरुवात करा ‘फिश ऑइल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Low Sperm Count | सध्या चुकीची जीवनशैली आणि इतर कारणांमुळे पुरुषांमध्ये स्पर्म काउंटची समस्या वाढली आहे. पुरुषांमध्ये कमी स्पर्म काउंट हे ऑलिगोस्पर्मिया म्हणून ओळखले जाते. शुक्राणूंच्या पूर्ण अनुपस्थितीला अ‍ॅझोस्पर्मिया म्हणतात. (Low Sperm Count)

जर एखाद्या पुरुषाच्या वीर्यात प्रति मिलिलिटर १५ मिलियनपेक्षा कमी शुक्राणू असतील तर त्यास शुक्राणूंची कमी संख्या असे मानले जाते. काही प्रकरणांमध्ये, असे पुरुष आहेत ज्यांचा कमी स्पर्म काउंट असूनही पितृत्वाचा अनुभव आला आहे. (Low Sperm Count)

फिश ऑइल पुरुषांसाठी खूप उपयुक्त ठरते, कारण ते त्यांच्या इरेक्शन आणि प्रजननक्षमतेत मदत करते. यासोबतच फिश ऑइलचे अनेक आरोग्य फायदे आहेत. यामध्ये ओमेगा -३ फॅटी अ‍ॅसिड भरपूर असते. पुरुषांच्या इतर काही सामान्य समस्या फिश ऑइलने दूर होतात. म्हणून, पुरुषांनी नियमितपणे फिश ऑइलचे सेवन करणे हा एक उत्तम पुरवठा स्त्रोत ठरू शकतो. फिश ऑइलचे पुरुषांसाठी असलेले आश्चर्यकारक फायदे जाणून घेऊया.

टेस्टोस्टेरॉन हार्मोन वाढवते

पुरुषांमध्ये या हार्मोनच्या कमतरतेमुळे लैंगिक इच्छा नसणे, इनफर्टिलिटीपासून केसगळतीपर्यंत अनेक समस्या दिसून येतात. अशावेळी फिश ऑइल घेतल्याने टेस्टोस्टेरॉन हार्मोनचे संतुलन राखले जाते.

ताण होतो कमी

ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड हे मानसिक आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे फॅट आहे.
ते मेंदू मजबूत करते. थकवा दूर करते. एवढेच नाही तर चिंता देखील कमी करते.

ताठरतेची समस्या

दिवसभराची धावपळ आणि ऑफिसमधील वातावरण यामुळे अनेक पुरूषांना तणाव जाणवतो.
यामुळे त्यांना अनेकदा सेक्श्युअल हालचालींमध्ये रस नसतो आणि लैंगिक इच्छेच्या अभावाचा सामना करावा लागतो.
यामुळे त्यांना शीघ्रपतनाची समस्या देखील होऊ शकते. या समस्यांवर मात करण्यासाठी,
फिश ऑइलचे सेवन उपयुक्त ठरते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

RBI Pilot Project | आरबीआय कडून कर्ज मिळणे होणार अधिक सुखकर; सुरु करणार नवीन पब्लिक टेक प्लॅटफॉर्म असणारा पायलट प्रोजेक्ट

MNS Chief Raj Thackeray | ‘जे आज खोके खोके ओरडत आहेत ना त्यांच्याकडे कंटेनर आहेत, ह्यांनी कोव्हीड पण…’ राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

New Housing Scheme | शहरामध्ये भाडेतत्त्वावर राहणाऱ्या लोकांना घेता येणार हक्काचे घर; पंतप्रधान मोदींनी केली नवीन योजना घोषित