LPG Connection | घरबसल्या करू शकता ‘फ्री एलपीजी गॅस’ कनेक्शनसाठी अर्ज, जाणून घ्या काय आहे प्रोसेस?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  एलपीजी गॅस कनेक्शन (LPG connection) घेण्यासाठी लोकांना पाच ते सहा हजार रुपये खर्च करावे लागतात. मात्र, हे कनेक्शन मोफत मिळू शकते. सरकारची एक योजना (PMUY) असून त्या अंतर्गत मोफत गॅस कनेक्शन (LPG gas connection) दिले जाते. या योजनेचे नाव प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (Ujjwala Yojana) आहे.

सरकारी तेल कंपन्या उज्ज्वलाच्या दुसर्‍या फेजचा अंतिम आराखडा तयार करत आहेत. तुम्हाला सुद्धा या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर घरबसल्या अर्ज करू शकता. या योजनेंतर्गत आता ते लोक सुद्धा LPG Connection घेऊ शकतात ज्यांच्याकडे कायमस्वरूपी अ‍ॅड्रेस नाही.

जाणून घ्या कोण घेऊ शकता लाभ?

या योजनेचा लाभ शहरात राहणार्‍या गरीबांना मिळेल. सोबतच योजनेचा लाभ देशातील विविध भागात नोकरीनिमित्त राहणार्‍या आणि जागा बदलणार्‍यांना सुद्धा मिळेल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM nirmala sitharaman) यांनी योजनेंतर्गत अगोदरच 1 कोटी कनेक्शन देण्याची घोषणा केली आहे.

2016 ची आहे ही योजना

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी 1 मे 2016 ला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची (Ujjwala Yojana) सुरुवात केली होती. या योजनेसाठी घरबसल्या ऑनलाइन अर्ज करू शकता. यासाठी महिलेचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे. सोबत बँक पासबुक आणि बीपीएल कार्ड (BPL Card) असावे.असा करा उज्ज्वला योजनासाठी अर्ज

https://www.pmuy.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

येथे ऑनलाइन अर्जाचा पर्याय निवडा

आता हे सिलेक्ट करा की, आता तुम्हाला कोणत्या कंपनीचे गॅस कनेक्शन हवे आहे.

यानंतर मागितलेली माहिती भरून सबमिट करा.

तुमची इच्छा असेल तर हा फॉर्म डाऊनलोड करून तो जवळच्या गॅस एजन्सी डिलरकडे सुद्धा जमा करू शकता.

 

Web Title : LPG Connection | get free lpg connection check how to apply details process here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Palghar ZP Election Result | पालघरमध्ये शिवसेनेला धक्का ! खासदाराच्या मुलाला पराजित करत भाजपची ‘बाजी’

Aryan Khan Drugs Case |’क्रूझ ड्रग्स पार्टीवरील छापा बनावट, या मागे भाजप’; आघाडी सरकारमधील मंत्र्याचा स्फोटक दावा (व्हिडिओ)

Modi Government | मोदी सरकार आणणार जेष्ठ नागरिकांसाठी ‘बेस्ट पेन्शन योजना’; मिळणार निश्चित परतावा; जाणून घ्या