LPG Connection | केवळ एका मिस्ड कॉलवरून मिळेज LPG कनेक्शन, ‘हा’ नंबर करा मोबाईलमध्ये सेव्ह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LPG Connection | आता तुम्हाला स्वयंपाकाच्या गॅसचे नवीन कनेक्शन (LPG connection) घेण्यासाठी डिस्ट्रीब्यूटरच्या ऑफिसच्या फेर्या माराव्या लागणार नाहीत. जर तुम्हाला एलपीजी कनेक्शन घ्यायचे असेल तर केवळ एक मिस्ड कॉल (Missed Call) करावा लागेल. यानंतर तुम्हाला सहजपणे स्वयंपाकाच्या गॅसचे कनेक्शन मिळेल.
इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने ट्विट करत ही माहिती दिली आहे की, आता ग्राहक एक मिस्ड कॉल देऊन सुद्धा गॅस कनेक्शन मिळवू शकतात. या सुविधेचा लभा कसा घ्यायचा ते जाणून घेवूयात…
करावा लागेल मिस्ड कॉल
एलपीजी ग्राहक सिलेंडर (LPG Connection) भरण्यासाठी देशात कुठूनही आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून एक मिस्ड कॉल 8454955555 नंबरवर देऊन आपला सिलेंडर बुक करू शकतात. कंपनीने म्हटले आहे की, या सुविधेचा लाभ घेतल्याने ग्राहकांच्या वेळेची बचत होणार आहे.
जुने कनेक्शन मानले जाईल अॅड्रेस प्रूफ
कंपनीच्या नवीन नियमांतर्गत नवीन कनेक्शन घेणार्या ग्राहकाच्या कुटुंबातील आई-वडिल, भाऊ-बहिण किंवा एखाद्या दूरच्या नातेवाईकाच्या नावावर एखादे एलपीजी गॅस कनेक्शन (LPG Connection) असेल तर ग्राहक त्या अॅड्रेसचा लाभ घेऊ शकतो. म्हणजे आई-वडिल, भाऊ-बहिण यांच्या अॅड्रेस प्रूफवर सुद्धा तुम्हाला कनेक्शन दिले जाते.
असा बुक करा एलपीजी सिलेंडर
– आपल्या रजिस्टर्ड नंबरवरून 8454955555 वर मिस कॉल द्या.
– भारत बिल पेमेंट सिस्टम (BBPS) च्या द्वारे सुद्धा एलपीजी सिलेंडर रिफिल करू शकता.
– इंडियन ऑईलचे अॅप (Indian Oil App) किंवा https://cx.indianoil.in च्या द्वारे सुद्धा बुकिंग होते.
– कस्टमर्स 7588888824 वर व्हॉट्सअप मेसेजद्वारे (WhatsApp SMS) सिलेंडर भरू शकतात.
– याशिवाय 7718955555 वर एसएमएस किंवा आयव्हीआरएस करून सुद्धा बुकिंग करू शकता.
– अमेझॉन (amazon) आणि पेटीएमद्वारे (Paytm) सुद्धा सिलेंडर भरू शकता.
Web Title :- LPG Connection | lpg gas connection give only one missed call check process
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update