LPG Gas Cylinder Price | 450 रुपयात मिळत आहे LPG गॅस सिलेंडर, सणासुदीमध्ये ‘या’ लोकांसाठी मोठी खुशखबर

नवी दिल्ली : LPG Gas Cylinder Price | मागील ऑगस्ट महिन्यात सणासुदीच्या काळात महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) एलपीजी सिलिंडरची (LPG Gas Cylinder Price) किंमत २०० रुपयांनी कमी केली होती. त्याचबरोबर उज्ज्वला योजनेंतर्गत (PM Ujjwala Yojana) लाभार्थ्यांना मिळणारी सबसिडी (Gas Subsidy) सुद्धा २०० रुपयांवरून वाढवून ३०० रुपये केली आहे.

मोदी सरकारच्या या प्रयत्नांमुळे देशाची राजधानी दिल्लीत सर्वसामान्य ग्राहकांसाठी घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत ९०३ रुपये झाली आहे. उज्ज्वला अंतर्गत, लाभार्थ्यांना दिल्लीत ६०३ रुपयांना सिलिंडर मिळत आहे.

मात्र, देशात असेही एक राज्य आहे जिथे घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत ४५० रुपये आहे. हे राज्य मध्य प्रदेश आहे. मध्य प्रदेशातील शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांच्या सरकारने ऑगस्ट महिन्यातच राज्यातील महिलांना ४५० रुपयांना गॅस सिलिंडर देण्याची घोषणा केली होती. मात्र, गॅस एजन्सीतून सिलिंडर घेताना महिलांना संपूर्ण किंमत मोजावी लागेल, त्यानंतर सरकार सबसिडी देईल. ४५० रुपयांनंतर जी रक्कम असेल ती सरकार सबसिडीच्या रूपात लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करेल. (LPG Gas Cylinder Price)

किती रुपयांची बचत
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये सध्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत ९०८ रुपये आहे. राज्य सरकारने केवळ ४५० रुपयांना सिलिंडर देण्याची घोषणा केल्यानंतर महिलांची ४५८ रुपयांची बचत होणार आहे.

फायदा कोणाला मिळणार?
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे सर्व लाभार्थी यासाठी पात्र असतील. तर उज्ज्वला योजना नसलेल्या बाबतीत लाडली
बहना योजनेतील पात्र महिलांना हा लाभ मिळेल. मात्र, कनेक्शन महिलेच्या असावे, हे महत्त्वाचे आहे.
या महिलांना लाडली बहना योजनेच्या पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. महिलांचे आर्थिक स्वावलंबन, त्यांचे आरोग्य,
पोषण स्तर सुधारणे आणि कौटुंबिक निर्णयांमध्ये त्यांची भूमिका मजबूत करणे या उद्देशाने मध्य प्रदेश सरकारने
लाडली बहना योजना सुरू केली होती.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुण्यातील बुधवार पेठेत ‘सासु’ची पुन्हा मोठी कारवाई, 7 बांगलादेशी महिलांना अटक

Cyber Fraud Case | सावधान! वकिलाने गमावले 9 लाख, गंडा घालण्याचा सायबर चोरट्यांचा नवा फंडा