LPG Gas Cylinder : गॅस सिलेंडरवर ग्राहकांना मिळू शकतो 50 लाखाचा फायदा, जाणून घ्या कसा घ्यायचा ‘लाभ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   घरगुती LPG गॅस सिलेंडरवर ग्राहकांना अनेक सुविधा मिळत आहेत. पेट्रोलियम कंपन्यांनी ग्राहकांना पसर्नल एक्सिडेंट कव्हर उपलब्ध करून दिला आहे. जर तुम्हीही सिलेंडरचा वापर करत असाल तर तुम्हाला हे माहिती पाहिजे की सरकारी तेल कंपन्यांकडून तुम्हाला 50 लाख रुपयांचा विमा लाभ मिळू शकतो.

घरगुती गॅस सिलेंडर वापरताना अनेक दुर्घटना घडल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या परिस्थितीत गॅस लिकेज होऊन स्फोट झाला तर तुम्हाला या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. या विमा योजनेसाठी पेट्रोलियम कंपन्यांची विमा कंपन्यांसोबत भागीदारी असते. सध्या हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल यांसारख्या कंपन्यांचा विमा ICICI लोम्बार्डच्या माध्यमातून विमा देत आहेत. गॅस सिलेंडरवर 50 लाखांचा क्लेम मिळू शकतो.

जाणून घ्या महत्वाचे मुद्दे –

https://mylpg.in या वेबसाईटनुसार, जर कोणतीही व्यक्ती LPG कनेक्शन घेते आणि त्याने घेतलेल्या त्या सिलेंडरमधून कोणतीही दुर्घटना होते तेव्हा त्याला 50 लाख रुपयांच्या विम्याचा दावा करता येऊ शकतो.

– 50 लाख रुपये नुकसान भरपाई मिळू शकते. LPG सिलेंडरच्या विमा कव्हर मिळवण्यासाठी याबाबतची माहिती पोलिस ठाणे आणि एलपीजी वितरकाला द्यायला हवी.

– ही पॉलिसी कोणत्याही एकाच्या नावाने नसते. तर प्रत्येक ग्राहक या पॉलिसीमध्ये कव्हर होतो. त्यासाठी कोणताही प्रीमियमही द्यावा लागत नाही. फक्त FIR कॉपी, जखमी झालेल्या रुग्णाचा खर्च आणि मेडिकल किंवा पोस्टमोर्टम रिपोर्ट, मृत्यू प्रमाणपत्र सांभाळून ठेवा.

– जर कोणतीही दुर्घटना झाली तर वितरकाच्या माध्यमातून नुकसान भरपाईचा दावा केला जातो. त्यानंतर दाव्याची रक्कम विमा कंपनी संबंधित वितरकाजवळ जमा करते आणि ही रक्कम ग्राहकाला मिळू शकते.