नोकरीची गॅरंटी मागितली अन् थेट काढूनच टाकलं; Lufthansa विमान कंपनीचा प्रताप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोना व्हायरसच्या महामारीत अनेकांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर काहींच्या पगारात कपात झाली. पण याच काळात नोकरी टिकावी म्हणून अनेकांनी प्रयत्न केले. मात्र, नोकरीची गॅरंटी मागण्यासाठी गेलेल्या 103 एअर होस्टेसना थेट नोकरीवरूनच काढून टाकल्याचे प्रकरण समोर आले आहे.

जर्मन एअरलाईन्स ‘लुप्थांसा’ या विमान कंपनीच्या प्रशासनाने ही कारवाई केली. या 103 एअर होस्टेस नोकरीची गॅरंटी मागण्यासाठी गेल्या होत्या. परंतु, या सर्वांना थेट नोकरीवरूनच काढून टाकण्यात आले. या सर्व कर्मचाऱ्यांना विमान कंपनी प्रशासनाने दोन वर्षांपर्यंत विनावेतन सुट्टीवर जाण्याचा पर्याय दिला होता. मात्र, त्यांनी तो नाकारल्यानेच या सर्व कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले. यामध्ये 15 वर्षांपेक्षाही अधिक काळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, अशी माहिती सूत्रांकडून दिली गेली.

याबाबत ‘लुफ्थांसा’च्या प्रवक्त्याने सांगितले, की कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे पुनर्व्यवस्थेशिवाय कोणताही पर्याय कंपनीकडे नाही. त्यामुळे विमान कंपनीने या निर्णय घेतला आहे.

विमानांच्या संख्येत कपात

सध्याची स्थिती पाहता 2025 पर्यंत दीर्घकालीन योजनांमध्ये विमानांची संख्या 150 ने कमी केली जाणार आहे. मात्र, केबिन क्रूच्या कर्मचारी संख्येवर कोणताही फरक पडणार नाही.

भारतीय एअर होस्टेसच्या नोकरीवरच कुऱ्हाड

नोकरीची गॅरंटी मागण्यासाठी गेलेल्या लुफ्थांसा या कंपनीने 103 भारतीय एअर होस्टेसच्या नोकरीवरच गदा आली आहे.