Madan Das Devi Passed Away | आरएसएसचे माजी प्रभारी मदन दास देवी यांचे बंगळुरूमध्ये निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Madan Das Devi Passed Away | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) माजी प्रभारी आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (Akhil Bharatiya Vidyarthi Parishad) माजी संघटन मंत्री मदन दास देवी (Madan Das Devi Passed Away) यांचे आज (सोमवार) पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली आहे.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे मागील अनेक दिवसांपासून मदन दास देवी (Madan Das Devi Passed Away) हे घरीच होते. त्यामुळे वर्षभरापूर्वी त्यांच्यावर हरिद्वारच्या पालमपूरच्या आयुर्वेद संस्थेत (Haridwar Palampur Institute of Ayurveda) पंचकर्म आणि इतर उपचारही करण्यात आले. बंगळुरू (Bangalore) येथे त्यांचे निधन झाले. दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर मंगळवार (दि. 25 जुलै) रोजी सकाळी 11 वाजता पुण्यात (Pune) अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मदनदास देवींनी बालपणापासूनच आपले आयुष्य राष्ट्रसेवा आणि संघकार्यात (RSS) घालवले. आयुष्यातील जवळपास
70 वर्ष त्यांनी संघाच्या प्रचारासाठी काम केले. संघापासून ते भाजप पर्यंत राजकीय निरीक्षक म्हणूनही ते कार्यरत होते.
विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय संघटन मंत्री म्हणून काम करताना त्यांनी अनेक नेते घडवलेत.
अरुण जेटली, अनंत कुमार, सुशिल मोदी, शिवराज सिंग चव्हाण, धर्मेंद्र प्रधान, विनोद तावडे अशा अनेक
भाजपाच्या नेत्यांनी त्यांच्याकडून समाजकार्य संघटनेचे शिक्षण घेतले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kolhapur Rain Update | कोल्हापुरातील पंचगंगा नदीने गाठली इशारा पातळी; अनेक रस्ते बंद, प्रशासन अलर्ट मोडवर