Kolhapur Rain Update | कोल्हापुरातील पंचगंगा नदीने गाठली इशारा पातळी; अनेक रस्ते बंद, प्रशासन अलर्ट मोडवर

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Kolhapur Rain Update | राज्यात अनेक भागात पावसाची (Kolhapur Rain Update) सतत रिपरिप सुरू आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात तर पावसाने चांगलाच जोर धरला आहे. पंचगंगा नदीने (Panchganga River) सोमवारी पहाटे तीन वाजता इशारा पातळी गाठली आहे. आता ती धोका पातळीकडे (Risk Level) हळूहळू सरकत असल्याने जिल्हा प्रशासन देखील अलर्ट (Alert) मोडवर आले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. पुराचे सावट असलेल्या भागातील नागरिकांना सतर्क करण्याची मोहीम महापालिका प्रशासनाने (Municipal Administration) राबवायला सुरुवात केली असल्याचे सांगण्यात येत आहे. पावसामुळे नदीची पाणी (Kolhapur Rain Update) पातळी वाढत चालली आहे. रविवारी सायंकाळी पंचगंगा नदी इशारा पातळीकडे वाटचाल करत होती. पहाटे तीन वाजता 39 फूट ही इशारा पातळी पंचगंगेने गाठली आहे. जिल्ह्यातील पाण्याखालील एकूण बंधाऱ्यांची संख्या 82 इतकी झाली आहे.

पुराचे पाणी आल्यामुळे शिवाजी पूल, गंगावेश रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन आपत्ती व्यवस्थापन (Fire Disaster Management) विभागामार्फत सुतारवाडा,
उलपे मळा, कसबा बावडा येथील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील राधानगरी धरणात 6.78 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. राधानगरी धरणातून (Radhanagari Dam) 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरणात 81 टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणांच्या स्वयंचलित दरवाज्यांपर्यंत पाणी आल्याने ते लवकर उघडण्याची शक्यता आहे.

26 जुलै पर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’

दरम्यान, हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department) कोल्हापूर आणि सातारा (Satara)
जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दोन्ही जिल्ह्यासाठी 26 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट (Orange Alert)
देण्यात आला आहे. दुसरीकडे, सांगली (Sangli) जिल्ह्यासाठी ग्रीन अलर्ट (Green Alert) देण्यात आला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Rain Update | राज्यात पावसाची दमदार बॅटिंग; कोकण, विदर्भात मुसळधार, तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा