Madhuri Dixit | माधुरीचा चाहता तिला भेटण्यासाठी लाईट दुरुस्ती करण्याच्या बहाण्याने घुसला घरात

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडची धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) ही अनेकांच्या ‘दिलों की धडकन’ आजही आहे. मनोरंजन विश्वामध्ये अनेक दशके प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री माधुरी हिचा चाहता वर्ग देखील लाखोंमध्ये आहे. लोक तिची एक झलक पाहण्यासाठी धडपड करत असतात. असाच तिचा एक चाहता तिला पाहण्यासाठी घरामध्ये घुसला होता. यावेळी माधुरी (Madhuri Dixit) देखील स्तब्ध झाली होती. तिला देखील काय करावे हे पटकन सुचले नव्हते. अभिनेत्री माधुरी दीक्षितने हा किस्सा शेअर केला आहे.

अभिनेत्री माधुरी दीक्षित ही लोकप्रिय कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show) मध्ये तिच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आली होती. यावेळी तिने तिच्या अजब फॅनचा किस्सा सर्वांसोबत शेअर केला होता. माधुरीच्या घरी एकदा लाईटचा स्वीच बोर्ड खराब झाला होता. यावेळी त्यांनी रिपेअर करण्यासाठी लाईटवाल्याला घरी बोलावले. यावेळी एक लाईटचा बोर्ड रिपेअर करण्यासाठी चार ते पाच लोक तिच्या घरी आले. मात्र यामध्ये तो चाहता देखील माधुरीच्या घरात दाखल झाला व ते लोक रिपेअरींग करुन गेले तरी तो तिथेच थांबून राहिला.

माधुरी दीक्षितने सांगितले की, “जेव्हा लोक स्वीचबोर्ड दुरुस्त करायला आले, त्या दिवशी मी सुद्धा घरीच होते. मग मी पाहिलं की एक छोटासा स्वीचबोर्ड दुरुस्त करण्यासाठी चार लोक घरी आले होते आणि त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती होती जी दूर उभी राहून सर्व काही पाहत होती. स्वीचबोर्ड ठीक झाल्यावर मी त्यांना थॅंक्यू बोलले आणि निघायला सांगितले. त्यानंतर तेही सगळे हसले व निघून गेले. पण तो बाजूला थांबलेला पाचवा माणूस तिथेच उभा राहिला. म्हणून मी त्याला विचारले काय झाले? तू का जात नाहीस?, तेव्हा तो मला म्हणाला की, मी त्यांचामधला नाही. मी फक्त तुम्हाला बघायला आलो आहे.”

अभिनेत्री माधुरीने (Madhuri Dixit) सांगितले की पुढे काय करावे हे देखील तिला सुचत नव्हते. कलाकरांना नेहमी त्यांचे असे अनोखे चाहते भेटत असतात. माधुरीने तिच्या या फॅनचा किस्सा सांगितल्यावर शो वर देखील एकच हशा पिकला. अभिनेत्री माधुरी दीक्षितने 80 व 90 चे दशके तिच्या अदांनी व अभिनयाच्या बळावर गाजवले होते. तिने एकामागोमाग एक हिट चित्रपट (Madhuri Dixit Hit Movie) दिले आहेत. अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचे ‘तेजाब’(Tezaab), ‘हम आपके हैं कौन’ (Hum Aapke Hain Koun), ‘बेटा’ (Beta) असे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police News | मुंढवा बिट मार्शलच्या कर्तव्य तत्परतेमुळे 70 वर्षीय वयोवृद्ध महिला सुखरुप