Madhuri Dixit Nene | ‘या’ कारणामुळे माधुरी दीक्षितने नाकारला होता हम साथ साथ है चित्रपट

पोलीसनामा ऑनलाईन – भाईजान सलमान खान आणि एक्स्प्रेशन क्वीन माधुरी दीक्षित (Madhuri Dixit Nene) ही जोडी बॉलीवूड मध्ये खूपच सुपरहिट राहिली. सलमान आणि माधुरीने 1991 मध्ये पहिल्यांदा ‘साजन’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यावेळी त्या दोघांना प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं. त्यानंतर आलेल्या ‘हम आपके हैं कौन’ने तर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळच घातला होता. मोठ्या पडद्यावरील दोघांची जोडी तुफान गाजली. (Madhuri Dixit Nene)

सलमान आणि माधुरीचे एकामागोमाग एक चित्रपट आले आणि सुपर डुपर हिट झाले. त्यानंतर दिग्दर्शक सूरज बडजात्या यांच्या ‘हम साथ साथ है’ या चित्रपटासाठी माधुरीला (Madhuri Dixit Nene) विचारण्यात आलं होतं. पण या चित्रपटासाठी माधुरीने चक्क नकार दिला. त्यानंतर या चित्रपटात अभिनेत्री तब्बूला घेण्यात आलं.रेडीफ. कॉम या पोर्टलच्या एका मुलाखतीत माधुरीने ‘हम साथ साथ हैं’मधील भूमिका नकारण्यामागचं कारण सांगितलं होतं.

या भूमिकेबद्दल बोलताना माधुरी म्हणाली, “दिग्दर्शक सूरज बडजात्या यांना ‘हम साथ साथ है’या चित्रपटात
मला कास्ट करायचं होतं. पण कोणत्या भूमिकेसाठी याबाबत त्यांचा बराच गोंधळ उडाला होता. मी करिश्मा कपूर किंवा सोनाली बेंद्रे यांनी साकारलेल्या भूमिका साकारू शकत नव्हते. कारण त्याआधी सलमान आणि माझा ‘हम आपके हैं कौन’ सुपरहिट ठरला होता. त्यामुळे त्यानंतरच्या सूरजजींच्या चित्रपटात माझी भूमिका त्याहून चांगली असणं अपेक्षित होतं. मला एक पाऊल मागे येऊन कोणतीही भूमिका साकारायची नव्हती.”

“बरीच चर्चा झाल्यानंतर त्यांनी मला तब्बूने साकारलेल्या थोरल्या सुनेची भूमिका ऑफर केली.
ज्यात एक सीन होता की सलमान खान त्याच्या वहिनीच्या पायांना हात लावून नमस्कार करतो आणि तिला
मिठी मारतो. याच सीनमुळे मी ही भूमिका नाकारली.
‘हम आपके हैं कौन’मध्ये आमच्या रोमान्सचं कौतुक झाल्यानंतर सलमानने माझ्या पायांना स्पर्श करून
मला नमस्कार करणं मला ठीक वाटलं नाही.” असं माधुरी या मुलाखतीत म्हणाली होती.

Web Title :-  Madhuri Dixit Nene | here is the reason why madhuri dixit reject film hum sath sath hai with salman khan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने; म्हणाले…

Maharashtra Politics | नक्की कोण करतयं बीडच्या राजकारणात ढवळाढवळ; चंद्रशेखर बावनकुळेंच्या ‘त्या’ वक्तव्याने खळबळ

Pune Crime News | 47 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा; कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात FIR