तब्बल 12 वर्ष आई होण्यापासून दूर राहिली मंदिरा बेदी, आता सांगितलं ‘ते’ कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मंदिरा बेदी कायमच आपल्या सोशल मिडियावर करत असलेल्या पोस्टमुळे चर्चेत असते. तिने तिच्या पहिल्या सिरियल शांतीपासून क्योंकि सास भी कभी बहू थी सारख्या सिरियलमधून चांगला अभिनय केला. तसेच दिलवाले दुलहनिया ले जाएंगे (1995) आणि आता ताशकंद फाइल आणि साहो सारखे सिनेमात तिने काम केले.

म्हणून मी आई होण्यासाठी थांबले होते –
मंदिरांने नुकतीच एक मुलाखत दिली त्यात तिने आपल्या वैयक्तिक जीवनाबाबत आणि करियर बद्दल चर्चा केली. ती म्हणाली की मी 12 वर्ष करिअरसाठी आई झाले नाही. मनोरंजनाच्या जगात मी स्वत:ची जागा बनवण्याचा प्रयत्न करत होती. त्यानंंतर मला असुरक्षित असल्याची भावना निर्माण झाली. परंतू आता मला आनंद वाटत आहे. मला स्वत:वर प्रेम आहे.

मंदिरा म्हणाली की, मनोरंजनाच्या क्षेत्रात महिलांची जास्त मोठी कारकीर्द होत नाही. मला वाटते की माझं काम करणे कधीही थांबणार नाही. सिनेमातून, टीव्हीमध्ये माझ्यापेक्षा जास्त काम करणाऱ्या एक्टरला पाहून मला असुरक्षित वाटते.

12 वर्षाने झाले आई –
मंदिराने 1999 मध्ये दिग्दर्शक राज कौशल बरोबर विवाह केला. त्यानंतर 12 वर्षांनी तिने मुलाला जन्म दिला. यावर विचारण्यात आलेल्या प्रश्न मंदिराने सांगितले की. मी 2011 मध्ये मुलाला जन्म दिला तेव्हा 39 वर्षांची होते, माझ्या कॉन्ट्रॅक्ट्समुळे मला प्रेग्नेट होता आले नाही, मला भीती वाटत होती की त्यामुळे माझे करिअर संपेल. ती म्हणाली की, मनोरंजन जगत खूप खराब आहे, मी माझ्या पतीच्या इच्छेविरोधात असे काही करु शकत नव्हती, माझ्या पतीमुळेच आमचे विवाह शक्य झाला.

You might also like