राज्यातील युती सरकारची ‘पतंजली’वर ‘कृपादृष्टी’, फक्‍त ४ दिवसात लातूरमधील ४०० एकर जमीन दिली

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन – राज्य सरकार रामदेव बाबांच्या पतंजलीवर चांगलेच मेहरबान असल्याचे दिसून येत आहे. पतंजलीला लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील ४०० एकर जमीन मिळाली आहे. विशेष म्हणजे या जमिनीच्या मोबदल्यात राज्य सरकार रामदेव बाबांकडून एक रुपयाही घेणार नाही. तसेच या जमिनीवर उभारण्यात येणाऱ्या उद्योगाला कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागणार नाही.याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदेव बाबांना पत्र देऊन त्यांच्या मागण्या कबूल केल्या आहेत.

जागतिक योग दिनानिमित्त नांदेडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रामदेव बाबा एकाच व्यासपीठावर योग करताना दिसून आले होते. त्याच दिवशी रामदेव बाबांच्या पतंजलीला राज्यात नवीन उद्योग सुरु करण्यासाठी निमंत्रण देण्यात आले होते. राज्य सरकारने पतंजलीसाठी अनेक सोयीसुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

पतंजलीला देण्यात आलेली जमीन माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी BHEL साठी (Bharat Heavy Electricals Limited) आरक्षित केली होती. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी निर्माण होतील, असे सांगण्यात आले होते. मात्र या जागेवर अद्याप प्रकल्प उभा राहिलाच नाही. आता तीच जमीन रामदेव बाबांच्या पतंजलीला देण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणी भाजप आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपण्याची शक्यता आहे.

नोकरीसाठी दिली होती जमीन

या परिसरात भेलचा प्रकल्प येणार होता, त्यामुळे पाच ते सहा हजार तरुणांना रोजगार मिळू शकणार होता. त्याच आशेवर गावकऱ्यांनी कवडीमोल भावाने जमिनी विकल्या होत्या. परंतु भेलऐवजी पतंजलीचा प्रकल्प येणार असल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. जमिनीही गेल्या आणि नोकऱ्याही गेल्या, अशी स्थानिकांची परिस्थिती आहे. सरकारने या जमिनी कोणालाही द्याव्यात, परंतु रेडीरेकनरनुसार भाव द्यावा आणि लोकांना नोकरीची हमी द्यावी, अशी मागणी स्थानिकांनी मांडली आहे.

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या