Mahant Sudhirdas | संयोगिताराजेंच्या ‘त्या’ पोस्टनंतर महंत सुधीरदास यांचे स्पष्टीकरण, म्हणाले – ‘अपमानास्पद वाटलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांच्या पत्नी संयोगीताराजे छत्रपती (Sanyogita Raje Chhatrapati) यांनी शुक्रवारी सोशल मीडियावर नाशिकच्या काळाराम मंदिरात (Kalaram Temple Nashik) पूजेदरम्यान झालेल्या घटनेविषयी पोस्ट केली होती. यावरुन चांगलाच वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र यावर काळाराम मंदिराचे महंत सुधीरदास (Mahant Sudhirdas) यांनी पत्रकार परिषद घेत प्रशासनाची भूमिका मांडली. तसेच संयोगीताराजे छत्रपती यांना त्यावेळी काही अपमानास्पद वाटलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो असेही महंत सुधीरदास (Mahant Sudhirdas) म्हणाले.

महंत सुधीरदास (Mahant Sudhirdas) यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाचा खुलासा केला. ते म्हणाले, संयोगीताराजे यांनी आता पोस्ट केली आहे. परंतु जवळपास पावणेदोन महिने झाले. त्यावेळी त्या नाशिकला आल्या होत्या. त्यावेळी संभाजीराजे छत्रपती यांचा वाढदिवस नाशिकमध्ये साजरा केला होता. वाढदिवसाच्या आदल्या दिवशी त्या काळाराम मंदिरात आल्या. या दिवशी त्यांनी मंदिरात काळारामाचे दर्शन घेत पूजा देखील केली. परंतु यात पुजारी किंवा मंदिर प्रशासनातील कोणत्याही व्यक्तीने चुकीचे वक्तव्य केले नसल्याचे सुधीरदास यांनी सांगितले.

संयोगीताराजे छत्रपती यांनी मंदिर पुजाऱ्याने वैदिक पद्धतीने पूजा करण्यास नकार दिल्याचे सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे. यावर सुधीरदास म्हणाले, पुराणोक्त या शब्दाला त्यांचा आक्षेप होता, परंतु आम्ही त्यांना काळाराम मंदिर परिसर दाखवत प्रसाद दिला. शिवाय त्यांनी 11 हजार रुपये दक्षिणाही दिली. राजेंच्या चांगल्या आरोग्यासाठी त्यांनी प्रर्थना केली. अधिकार वगैरे मी असं कुठलंही वाक्य बोललेलो नाही. तरी देखील आम्ही कोल्हापूरला जाऊन त्यांची भेट घेऊ असे त्यांनी सांगितले.

सुधीरदास पुढे म्हणाले, वेदोक्त पूजन व्हावे अशी संयोगीताराजे यांची इच्छा होती. त्यावेळी श्रुती स्मृती पुराणोक्त असं मी म्हटलो होतो.
काही वर्षांपूर्वी शाहू महाराजांबाबत जी घटना घडली, त्याच्याशी पुजारी घराण्याचा काहीही संबंध नाही.
आमच्यासाठी छत्रपती घराणे हे आदरणीय आहे. अशा घटनांमध्ये ब्राह्मण आणि पुजारी हे सॉफ्ट टार्गेट केले जाते,
असा आरोप सुधीरदास यांनी केला. संयोगीताराजे यांनी मंदिरात महामृत्युंजय, रामरक्षा म्हटले.
त्यावेळी जर त्यांना अपमान झाल्याचं वाटत असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो.

Web Title :- Mahant Sudhirdas | mahant sudhirdas on sambhajiraje wife sanyogeetaraje chhatrapati post

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amba Mahotsav Pune 2023 | ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ योजनेंतर्गत ‘आंबा महोत्सव’ 1 एप्रिलपासून

Nandurbar Police | नंदुरबार पोलिसांनी दोन दिवसात रोखला सलग दुसरा बालविवाह