बुडालेल्या बार्ज P305 जहाजाच्या कॅप्टनवर FIR दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अरबी समुद्रात आलेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळात मुंबई हाय जवळ तराफा पी ३०५ हे जहाज बुडाले. त्यावरील २६ जणांचा मृत्यु झाला असून अजून ४९ जण बेपत्ता आहेत. चक्रीवादळाच्या वेळी कामगारांचा जीव धोक्यात घातल्याबद्दल या पी ३०५ जहाजाचे कॅप्टन राकेश बल्लाव, मुख्य अभियंता रहमान शेख आणि इतरांवर यलोगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई हाय समुद्रात ५ तराफे उभारण्यात आले आहेत. चक्रीवादळ येणार असल्याचे माहिती असतानाही जवळपास ८०० कामगार समुद्रात ठेवण्यात आले. चक्रीवादळ आल्यानंतर हा संपूर्ण परिसर संवेदनशील बनला. व या सर्व कामगारांचे जीव धोक्यात आले होते. तेव्हा नौदलाने दोन दिवसात ६२२ जणांची सुटका केली. मात्र, ही मोहिम राबवत असताना पी ३०५ हे जहाज बुडाले व त्यावरील २६ जणांचा मृत्यु झाला तर अजूनही ४९ जण बेपत्ता आहे.

चक्रीवादळ येणार असल्याची माहिती असतानाही इतक्या मोठ्या संख्येने कामगारांना समुद्रात ठेवून त्यांचा जीव धोक्यात आणल्याबद्दल कॅप्टन व मुख्य अभियंतांवर ३०४ (२), ३३८, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.