Maharashtra Assembly Elections 2024 | मनसेचा विधानसभेचा पहिला उमेदवार जाहीर; ‘या’ नावाची घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Assembly Elections 2024 | आगामी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झालेली असतानाच मनसेकडून (MNS) पहिल्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. महायुतीला (Mahayuti) पाठिंबा देणाऱ्या मनसेने उमेदवार घोषित केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा वाढदिवस मीरारोड (Mira Road) भागात स्थानिक मनसेचे कारकर्ते आणि पदाधिकारी यांनी साजरा केला. यावेळी मनसे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी याबाबत थेट घोषणाच केली.

या कार्यक्रमात बोलताना अविनाश जाधव म्हणाले, “संदीप राणे (Sandeep Rane) यांच्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा आपल्या सर्वांना पहायला मिळाली आहे. त्यामुळं आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की संदीप ज्या पद्धतीनं काम करतोय त्यामुळं १४५ मीरा-भाईंदर या विधानसभा मतदारसंघातून (Mira Bhayandar Assembly Constituency) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तो उमेदवार असेल. अभिजीत पानसे, राजू पाटील (MLA Raju Patil) आणि मी आम्ही संदीप राणेंसाठी ही जागा नक्कीच घेऊन येऊ. संदीप आमदार झाले पाहिजेत ही सर्वस्वी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे,” असं आवाहनही यावेळी अविनाश जाधव यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केलं.

दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे जुलै मध्ये महाराष्ट्र दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते उर्वरित उमेदवारांची चाचपणी करतील त्यानंतर उमेदवारांची नावे जाहीर होण्याची प्रक्रिया होईल. मात्र राज ठाकरेंनी उमेदवारी जाहीर करण्यापूर्वीच अविनाश जाधवांनी पहिला उमेदवार जाहीर केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dattatray Bharne | आमदार दत्तात्रय भरणे यांना सायबर चोरट्यांनी बनवलं ‘मामा’, अपघाताची बतावणी करुन घातला गंडा

Sinhagad Road Pune Crime News | पुणे : वाहन चोरी करणाऱ्या दाम्पत्याला सिंहगड पोलिसांकडून अटक, 8 चारचाकी व 9 दुचाकी जप्त (Video)