Maharashtra Assembly Session 2023 | विजय वडेट्टीवारांचं अभिनंदन करताना फडणवीसांची उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोपरखळी; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Assembly Session 2023 | महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या विरोधी पक्षनेते पदावर (Opposition Leader) कोण विराजमान होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अजित पवार गट (Ajit Pawar Group) सरकारमध्ये सामील झाल्यानंतर विरोधी पक्षांत काँग्रेसचं (Congress) संख्याबळ सर्वाधिक ठरलं. त्यानुसार आमदार विजय वडेट्टीवार (MLA Vijay Wadettiwar) यांची निवड विरोधी पक्षनेते म्हणून करण्यात आली. त्यांच्या अभिनंदन प्रस्तावावर भाषण करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार टोलेबाजी केली. (Maharashtra Assembly Session 2023)

वडेट्टीवारांचा आवाज बुलंद

विजय वडेट्टीवारांचं अभिनंदन करताना फडणवीसांन मिश्किल टिप्पणी केली. विजय वडेट्टीवारांचा माईक सुरु करा अथवा करु नका. त्यांना माईकची गरज नाही. त्यांचा आवाज कोणत्याही माईक पेक्षा मोठा आहे. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्याशी त्यांची स्पर्धा आहे. सुधीरभाऊही एक किलोमीटरवरुन आल्याचं आपल्या लक्षात येतं. त्यामुळे विजय वडेट्टीवारांचा आवाज बुलंद असल्याचे फडणवीस म्हणाले. (Maharashtra Assembly Session 2023)

फडणवीसांनी सांगितला ‘तो’ प्रसंग

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एका निवडणुकीच्यावेळी घडलेला प्रसंग सांगितला. राणेंनी (Narayan Rane) दुर्दैवानं शिवसेना (Shivsena) सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांना ज्यांनी साथ दिली, त्यातले विजय वडेट्टीवारही होते. तेव्हा एक कठीण पोटनिवडणूक (By-Elections) होती. त्यात आम्ही सगळे विजय वडेट्टीवारांना पाडण्यासाठी गेलो होतो. कारण ते नुकतेच शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेले होते. आम्हाला त्यांना पराभूत करायचं होतं. पण तेव्हाही मी पाहिलं की त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. त्यामुळे त्या निवडणुकीत ते निवडून आले. त्यानंतरही सतत ते तिथून निवडून आले. 2014 साली त्यांनी चिमूर ऐवजी ब्रह्मपुरी मतदारसंघ निवडला. तिथे पहिल्यांदाच गेल्यानंतर त्यांनी त्याठिकाणी विजय मिळवला.

अजित पवारांना कोपरखळी

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विजय वडेट्टीवारांचं अभिनंदन करतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोपरखळी मारली. 2019 हे वेगळ्याच प्रकारचे वर्ष आहे. या वर्षात अनेक लोकांनी अनेक विक्रम केले आहेत. एक विक्रम तर आमच्या मुख्यमंत्र्यांचा आहेच. त्यांनी ज्या प्रकारे सत्तापरिवर्तन केलं, मुख्यमंत्री म्हणून ते ज्या प्रकारे कारभार चालवताय ते पाहता 2019 चे हिरो तेच आहेत. पण त्यासोबतच 2019 सालचे दुसरे हिरो अजितदादा आहेत.

2019 साली अजित पवार आधी माझ्याबरोबर उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर उद्धव ठाकरेंबरोबर (Uddhav Thackeray) उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर विरोधी पक्षनेते झाले. आता पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. त्याच्या खालोखाल मी आहे. मी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मग विरोधी पक्षनेता झालो. आता उपमुख्यमंत्री झालो, असे फडणवीस म्हणाले.

आता काही बदल नाही

आता काही बदल नाहीये हां. आता लक्षात ठेवा. आता आम्ही तिघंही ज्या पदावर आहोत.
त्याच पदावर राहणार आहोत. अतिशय उत्तम काम करणार आहोत,
असं फडणवीस म्हणताच समोरच्या बाकावरून भास्कर जाधवांनी (Bhaskar Jadhav)
‘मनापासून ना?’ असा मिश्किल सवाल केला. त्यावर 100 टक्के,
आपलं मनापासूनच असतं. पाच वर्ष मुख्यमंत्रीपदावर मी योग्य काम केलं आहे.
त्यामुळे आता जी जबाबदारी मिळाली. त्यात मी अतिशय आनंदी आहे. काम करायला मजा येत आहे. चांगले सहकारी आहेत. त्यामुळे मला त्यात वावगं काहीही वाटत नाही, असं फडणवीस म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Session 2023 | विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काढला चिमटा, म्हणाले… (व्हिडिओ)