Maharashtra ATS | पंजाबमधील गँगस्टर, दहशतवादी हरविंदर सिंग उर्फ रिंदा व सोनू खत्री गँगमधील 3 आरोपींना महाराष्ट्र एटीएसकडून अटक

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra ATS | पंजाब येथील गँगस्टर (Gangster), दहशतवादी हरविंदर सिंग उर्फ रिंदा (terrorist Harvinder Singh alias Rinda) व सोनू खत्री गँगमधील (Sonu Khatri gang) तीन आरोपींना महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (Maharashtra ATS) आणि पंजाब पोलिसांच्या (Punjab Police) पथकाने संयुक्त कारवाई करुन अटक (Arrest) केली आहे. ही कारवाई रविवारी (दि.8) एन.आर.सी. कॉलनी, आंबिवली, कल्याण (Kalyan) परिसरात करण्यात आली.

शिवम अवतारसिंग महालो (वय-22 रा. नवाशहर, पेठ महंत, पंजाब), गुरुमुख नरेशकुमार सिंह उर्फ गोरा (वय-23 रा. उधनेवाला, ता. बलाजोर, पंजाब), अमनदिप कुमार गुरमेलचंद उर्फ रॅन्चो (वय-21 रा. खमा चौक, ता. बंगाशहर, पंजाब) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींवर राहोन पोलीस ठाण्यात (Rahon Police Station) आयपीसी 302, 148, 148,25, 54, 59 आर्म अॅक्ट (Arm Act) अंतर्गत गुन्हा दाखल आहे. अटक करण्यात आलेले आरोपी सोनू खत्री गँगचे सदस्य असून ते दहशतवादी हरविंदर सिंग उर्फ रिंदा याच्या संपर्कात होते.

दहशतवादी हरविंदर सिंग उर्फ रिंदा याच्या संपर्कात असलेले तीनजण कल्याण परिसरातील आंबिवली येथे राहत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला (Maharashtra ATS) मिळाली.
तसेच त्यांच्याकडे विदेशी पिस्टल असण्याची शक्यता असल्याची माहिती पथकाला मिळाली.
त्यानुसार एटीएस आणि पंजाब पोलिसांच्या दोन पथकांनी आरोपींचा शोध सुरु केला.
त्यावेळी आरोपी हे आंबिवली येथील यादवनगर येथे असल्याची माहिती मिळाली.
पंजाब पोलीस आणि महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने संयुक्त कारवाई करुन आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

अटक करण्यात आलेले आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर पंजाब मध्ये खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत,
बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, स्फोटक पदार्थ बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या काळाचौकी, विक्रोळी, ठाणे, नवी मुंबई युनिट
व पंजाब पोलिसांनी संयुक्तपणे केली.

Web Title :- Maharashtra ATS | Maharashtra ATS arrests 3 accused in Punjab gangster, terrorist Harwinder Singh alias Rinda and Sonu Khatri gang

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावर अजित पवारांची तीव्र नाराजी; म्हणाले…

Pune Pimpri Crime | OLX वर कार घेणं पडलं महागात, युवकाची साडेचार लाखाची फसवणूक; सांगवी परिसरातील घटना