महाराष्ट्र : कोंबडीच्या 3 अंड्यांमुळं पती-पत्नीमध्ये झाला वाद, त्यानंतर पोलीस ठाण्यात पोहोचलं प्रकरण

ADV

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   सामान्यत: बरेच लोक स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी कोंबडीची अंडी खातात. तुम्ही ऐकलं असेल की संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे. पण एका अंड्यामुळं पती-पत्नीमध्ये वाद होऊ शकतो का? वाद देखील इतका की हे प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचावे. होय, अशीच एक घटना महाराष्ट्रातून समोर आली आहे जिथे पती-पत्नीच्या भांडणाला अंडे कारणीभूत ठरले. एवढेच नव्हे तर भांडण इतके वाढले की हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. मग पोलिसांनीही हे प्रकरण एका अनोख्या पद्धतीने सोडविले.

प्रकरण महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा गावातील आहे. जेथे पती-पत्नी एकमेकांची तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. पती-पत्नी भांडण करत येत असल्याचे पाहून पोलिसांनीही विशेष रस दाखविला नाही. परंतु जेव्हा पोलिसांना हे समजले की यांच्यातील वादाचे कारण म्हणजे तीन अंडी आहेत, तेव्हा त्यांनाही धक्का बसला. मग काय, पोलिसही त्यांची तक्रार ऐकण्यासाठी बसले.

ADV

पतीने पोलीस अधिकाऱ्याला सांगितले की त्याने बाजारातून 3 अंडी आणली होती आणि पत्नीला भुरजी बनवायला सांगितले. पत्नीने अंड्याची भुरजी बनविली पण ती तिने आपल्या मुलीला खाऊ घातली. जेव्हा तो परत आला तेव्हा त्याने आपल्या बायकोकडे अंड्याची भुरजी मागितली. यावर पत्नीने सांगितले की अंड्याची भुरजी तर मुलीने खाल्ली आहे. या कारणामुळं पती-पत्नीमध्ये जोरात वाद सुरू झाला.

हा वाद इतका वाढला की या प्रकरणाने पोलीस स्टेशन गाठले. त्याचवेळी त्यांच्या भांडणाचे कारण ऐकून पोलिसांनाही हसू आले. साखरखेर्डा पोलिस अधिकाऱ्याने देखील एका अनोख्या पद्धतीने पती-पत्नीमध्ये सलोखा घडवून आणला. पोलीस अधिकारी जितेंद्र अडोळे यांनी आपल्या कर्मचार्‍यांपैकी एकाला बाजारात पाठवले आणि तीन अंडी आणण्यास सांगितले. त्यानंतर ती अंडी पती-पत्नीला देण्यात आली. मग पती-पत्नी आनंदाने तेथून घरी गेले. पोलिसांनी सांगितले की पती बिल्डिंग बांधकामात मिस्त्रीच्या हाताखाली काम करून कसे-बसे घर चालवतो.