Maharashtra Budget Session 2023 | कांद्याच्या मुद्यावरुन सदनात घमासान ! उपमुख्यमंत्री आक्रमक, म्हणाले – ‘शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उत्तर हवे आहे की…’ (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Budget Session 2023 | अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कांदा मुद्यावरुन सदनात घमासान झाले. विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर गळ्यात कापसाच्या माळा आणि टोपलीत कांदा (Onion Rate) आणून आंदोलन केले. यानंतर विधानभवनाच्या कामकाजाला सुरुवात कांद्याच्या मुद्यावरुन झाली. कांद्याच्या प्रश्नावरुन विरोधक आक्रमक झाले होते. विरोधकांच्या प्रश्नाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे उत्तर देण्यासाठी उभे राहिले असता विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकारची बाजू घेत विरोधकांना चांगलेच सुनावले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नाफेडने (Nafed) खरेदी सुरु केली आहे. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या पश्नावर उत्तर हेवे आहे की विरोधकांना राजकारण करायचे आहे? आम्ही सांगत असलेली माहिती चुकीची आहे असे वाटत असेल तर हक्कभंग आणा अशा शब्दात त्यांनी विरोधकांना सुनावलं.

यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभं आहे.
कांदा खरेदी सुरु झाली असून कांदा खरेदी सुरु झालेली नाही तेथे ती सुरु केली जाईल अशी ग्वाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देणारे आहे.
आम्ही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निकषापेक्षा जास्त मदतही केली आहे.
आतापर्यंत 2.38 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी झाला आहे. कांदा निर्यातीवर देखील बंदी नाही.
त्यामुळे कांदा शेतकऱ्यांना सुद्धा आवश्यकतेनुसार मदत जाहीर केली जाईल असेही त्यांनी सभागृहात सांगितले.

Web Title :- Maharashtra Budget Session 2023 | maharashtra assembly budget session 2023 onion issue opponents demand to increase the export cm eknath shinde bjp

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | शासकीय अधिकारी तरुणीवर ओळखीतून केला अत्याचार; अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन उकळले १६ लाख ८६ हजार

Maharashtra Budget Session 2023 | गळ्यात कांद्याची माळ, डोक्यावर टोपली; विधिमंडळाबाहेर विरोधकांची जोरदार घोषणाबाजी (व्हिडिओ)

Sachin Tendulkar | वानखेडे स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकर यांचा उभारणार पुतळा; मुंबई क्रिकेट असोसिएशनचा मोठा निर्णय