Maharashtra Cabinet Decision | राज्य सरकारचा मोठा निर्णय! राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयात मोफत उपचार मिळणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Cabinet Decision | राज्य सरकारने (State Government) एक मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या (Public Health Department) सर्व रुग्णालयात मोफत उपचार (Free Treatment) मिळणार आहे, याबद्दल मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Maharashtra Cabinet Decision) एकमताने निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा राज्यातील गरीब, गरजू, रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. येत्या 15 ॲागस्टपासून राज्यात मोफत आरोग्य सेवा सुरू करण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत (Health Minister Prof. Dr. Tanaji Sawant) यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.

गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Maharashtra Cabinet Decision) पार पडली. या बैठकीत आरोग्य खात्याशी संबंधित हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय राज्यघटनेतील (Constitution of India) आर्टिकल 21 (Article 21) च्या अंतर्गत असलेल्या चांगल्या आरोग्यासह जगण्याचा नागरिकांना अधिकार आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र (Primary Health Centre), ग्रामीण रुग्णालय (Rural Hospital), स्त्री रुग्णालय (Women’s Hospital), जिल्हा सामान्य रुग्णालय (District General Hospital), उपजिल्हा रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय (Super Speciality Hospital – नाशिक आणि अमरावती), कॅन्सर हॉस्पिटल (Cancer Hospital) या ठिकाणी मोफत उपचार मिळणार आहेत. सध्या या सर्व रुग्णालयात वर्षभरात उपचार घेण्यासाठी सुमारे 2 कोटी 55 लाख नागरीक येतात. राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकूण 2418 संस्था आहेत. या सर्व ठिकाणी मोफत उपचार रुग्णांना मिळणार आहेत.

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले की, ओपीडी मध्ये येणाऱ्या रुग्णांना केस पेपर काढणं,
चलन भरणं यासाठी दोन तीन तास रांगेत उभं राहावं लागतं.
या सगळ्याचा अंदाज घेतला तर 71 कोटी रुपये दरवर्षी शासनाच्या तिजोरीत जमा होतात.
मात्र रांगेत उभं राहिल्याने अनेकदा उपचाराला उशीर होतो.
PHC ते जिल्हा रुग्णालयापर्यंत सर्व सरकारी रुग्णालयात केस पेपरच्या चार्जपासून
ते शस्त्रक्रियेपर्यंत सर्व उपचार मोफत मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
हा निर्णय आरोग्य विभागाचा असून त्याअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयासाठी हा निर्णय लागू असणार आहे.
महापालिकेच्या रुग्णालयात (Municipal Hospital)
ही सेवा मिळणार नसून मोफत उपचारासाठी आधार कार्ड दाखवावे लागतील, असेही तानाजी सावंत यांनी स्पष्ट केलं.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chrisann Pereira | खोट्या ड्रग्ज प्रकरणात अडकलेली अभिनेत्री क्रिसन परेरा भारतात परतली;
शारजाह तुरुंगातून झाली सुटका