Maharashtra Cabinet Decision | 75000 पदांच्या नोकरभरतीला गती देणार, शिंदे सरकारचा महत्त्वाचा निर्णय (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक (Maharashtra Cabinet Decision) आज (दि. 29) पार पडली. यावेळी महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्य सरकारने येत्या काळात 75 हजार पदांच्या नोकरभरतीला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस भरतीसाठी अर्ज भरण्याची मुदत 15 दिवसांनी वाढविण्यात आली आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करणार असून, 3 डिसेंबरपासून तो कार्यान्वित करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Maharashtra Cabinet Decision) घेण्यात आला असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

 

राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत (Maharashtra Cabinet Decision) अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यावेळी महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार थकबाकी देण्याबाबत उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. अधिसंख्य पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवाविषयक लाभ देण्यात येणार असून, अनुसूचित जाती जमातींची रिक्त पदे तत्काळ भरण्याची देखील सूचना करण्यात आली आहे. राज्य सरकार 452 कोटी रुपये खर्च करुन सोलापूर – तुळजापूर – उस्मानाबाद हा नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग तयार करणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील भाडेपट्टयांना 1 हजार रुपये मुद्रांक शुल्क आकारण्यात येणार आहे, असे यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नमूद केले.

 

तसेच अमरावती जिल्ह्यातील वासनी मध्यम प्रकल्पाच्या 826 कोटींच्या खर्चास सुधारित मान्यता देण्यात आली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील कोरडीनाला प्रकल्पाच्या 169.14 कोटी खर्चास सुधारित मान्यता देण्यात आली आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांना 2006 ते 2008 या वर्षातील उत्कृष्ट कामासाठी आगाऊ वेतन वाढीचा लाभ देण्याचा निर्णय,
या बैठकीत घेण्यात आला आहे.

गावोगावी इंटरनेटच्या सुविधा वाढविण्यासाठी प्रधानमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या
डिजिटल इंडिया मोहिमेस वेग देण्याकरिता राज्यातील २३८६ गावांमध्ये बीएसएनएलला मनोरे
उभारण्यासाठी २०० चौ.मी. जागा मोफत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

 

 

Web Title :- Maharashtra Cabinet Decision | maharashtra cabinet decision shinde fadnavis government cabinet meeting decision of mega recruitment electricity bill seventh pay commission

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Sanjay Raut | सीमावादावरुन संजय राऊतांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल, म्हणाले – ‘त्या लोकांना घालवण्यासाठी पुन्हा…’

MNS Chief Raj Thackeray | आम्ही फक्त प्रश्न सोडवायला असतो, आम्हाला कोणी मते देत नाही – राज ठाकरे

Anupam Kher | काश्मीर फाइल्सवर झालेल्या टीकेनंतर ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी ट्वीट करत दिले ‘हे’ प्रतिउत्तर