Maharashtra Cabinet Decision | अयोध्येतील प्राणप्रतिष्ठानिमित्त सवलतीच्या दरात ‘आनंदाचा शिधा’, मंत्रिमंडळाने घेतले ९ महत्वाचे निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Cabinet Decision | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी २२ जानेवारीला अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या (Ram Mandir Ayodhya) मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना दिवस दिवाळीसारखा साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार महायुती सरकारने दिवाळीप्रमाणेच राज्यातील सुमारे दीड कोटी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत (Maharashtra Cabinet Decision) घेतला आहे. तसेच सत्यशोधक सिनेमा करमुक्त करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत एकुण ९ महत्वाचे निर्णय घेण्यात आले. (Anandacha Shidha)

मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रति शिधापत्रिका आनंदाचा शिधा देण्यास मंजुरी देण्यात आली. यामध्ये १०० रुपयांत १ किलो रवा, १ किलो चणाडाळ, १ किलो साखर आणि १ लिटर पामतेल देण्यात येणार आहे.

तसेच मंत्रिमंडळ बैठकीत सत्यशोधक मराठी चित्रपटास राज्य वस्तू व सेवा कर कायद्यांतर्गत आकारल्या जाणाऱ्या राज्य वस्तू व सेवा कराच्या प्रतिपूर्तीस मंजुरी देण्यात आली.

तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदान ५० हजारांवरून एक लाखांपर्यंत करण्यास मान्यता देण्यात आली.

मंत्रिमंडळ बैठकीतील अन्य महत्वाचे निर्णय पुढील प्रमाणे –

  • जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र विरार या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना व सेवानिवृत्ती
    वेतन योजना लागू करण्यास मंजुरी देण्यात आली.
  • राज्यात नागरी भागातील अतितीव्र कुपोषित बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यास मान्यता
    देण्यात आली.
  • ग्रामविकास विभागातील योजनांच्या जाहिरात व प्रसिद्धीसाठी नविन लेखाशिर्ष उघडण्यास मंजुरी दिली.
  • शासकिय लेख्यातून (मकोनी नमुना क्रमांक ४४ द्वारे) आहरित करण्यात आलेल्या सहायक अनुदानाच्या
    जलद संवितरण व संनियंत्रणासाठी आहरण व संवितरण अधिकारी आणि अन्य अशासकीय कार्यान्वयन
    प्राधिकारी यांच्याकरिता आभासी वैयक्तिक ठेव लेखा कार्यपद्धती लागू करण्यास मंजुरी देण्यात आली.
  • महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम,१९९९ लागू असलेल्या पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित परिमंडळातील गावठाणामधून स्थलांतरीत न झालेल्या गावठाणातील प्रकल्पग्रस्तांना नवीन पुनर्वसित
    गावठाणाऐवजी रोख रक्कम स्वरुपात आर्थिक पॅकेज देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MCOCA Action | कात्रज परिसरात दहशत पसरवणाऱ्या प्रवीण येणपुरे टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 113 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीस्वारामुळे तरुणाने गमावला जीव; दोघांना अटक

Pune Cheating Fraud Case | पुणे : फ्लॅट देण्याच्या बहाण्याने एक कोटींची फसवणूक, बिल्डर सह चार जणांवर FIR