Maharashtra Cabinet Expansion | मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला, पण इच्छूकांना वाट पहावी लागणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Cabinet Expansion | राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी 30 जून रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस (BJP Leader Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, त्यानंतर महिनाभर रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार झाला. या मंत्रिमंडळ विस्तारात (Maharashtra Cabinet Expansion) 18 जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. यामध्ये भाजपचे 9 आणि शिंदे गटाच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ (Ministerial Oath) घेतली.

 

मंत्रिमंडळ विस्तारामध्ये (Maharashtra Cabinet Expansion) अपक्ष, मित्रपक्षांना सामावून घेतले नाही. तर शिंदे गटातील (Shinde Group) अनेकांनी मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली. दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नाराजांना स्थान दिले जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. राज्यातील दुसरा मंत्रिमंडळ विस्तार गणेशोत्सव (Ganeshotsav) झाल्यानंतर होईल अशी चर्चा होती. मात्र, आता हा विस्तार दिवाळीपूर्वी (Diwali) होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मंत्रिपदाची आस लावलेल्यांना आणखी काही दिवस वेटिंगवर राहावं लागणार आहे.

 

एका वृत्तवाहिनीने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, दुसऱ्या टप्प्यात 24 मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. त्यात 7 कॅबिनेट आणि 17 राज्यमंत्र्यांना शपथ दिली जाईल. यात शिंदे गटाला आणखी चार कॅबिनेट (Cabinet) मंत्रिपदे मिळणार आहेत. त्यामुळे शिंदे गटातील नाराजांची दुसऱ्या कॅबिनेट विस्तारात वर्णी लागणार का ते पहावे लागेल. सध्या सरकारमध्ये 18 कॅबिनेट मंत्री आहेत. यामध्ये महत्त्वाची खाती फडणवीस आणि शिंदे यांच्याकडे आहेत.

 

नाराज आमदारांवर ठाकरे गटाचे लक्ष

पहिल्या मंत्रिमंडळात मंत्रिपद न मिळाल्याने शिंदे गटातील काही आमदार नाराज होते.
यातील काहींनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. तसेच खातेवाटपावरुन मंत्री नाराज असल्याचे समोर आले होते.
त्यात नाराज आमदारांवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे लक्ष आहे.
नाराजी कायम राहिली तर या आमदारांना पुन्हा आपल्याकडे वळवण्यासाठी उद्धव ठाकरे गट सक्रीय आहे.
त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार करताना शिंदे-फडणवीस यांना सावध पावलं टाकावी लागतील.
अन्यथा नाराज आमदारांमुळे डोकेदुखी वाढू शकते.

 

Web Title : –  Maharashtra Cabinet Expansion | eknath shinde devendra fadnavis cabinet expansion ministerial formula fixed but second expansion delayed

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा