Maharashtra Cabinet Expansion | मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची महत्त्वाची माहिती, म्हणाले…

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Cabinet Expansion | मुंबई-गोवा मार्गावरील (Mumbai-Goa Route) एक लेन गणेशोत्सवापूर्वी (Ganeshotsav) तयार करणार असून सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पर्यटनास मोठा वाव आहे. त्यामुळे निसर्गाची हानी न करता पर्यटनविकास (Tourism Development) करण्यात येईल. तसेच यापुढे कोणत्याही परिस्थितीत अनाधिकृत बांधकाम होणार नाही याबाबत सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली. तसेच राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) लवकरात लवकर करण्यात येईल, असेही शिंदे यांनी सांगितले. (Maharashtra Cabinet Expansion)

सातारा येथील शासकीय विश्रामगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तसेच प्रश्नांच्या अनेक प्रश्नांची उत्तरेही त्यांनी यावेळी दिली. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई (Guardian Minister Shambhuraj Desai), आमदार मकरंद पाटील (MLA Makarand Patil), जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी (Collector Jitendra Dudi), पोलिस अधीक्षक समीर शेख (SP Sameer Sheikh), मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी (CEO Dyaneshwar Khilari) आदी उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रथम हेलिकॉप्टरने सैनिक स्कूलच्या मैदानावर आगमन झाले. तेथील स्वागतानंतर ते विश्रामगृहात दाखल झाले. (Maharashtra Cabinet Expansion)

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबई-गोवा महामार्गाबाबत मी स्वत: बैठक घेतली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी स्वत: लक्ष घातले आहे. तसेच मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) हे कामावर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी एक लेन पूर्ण केली जाणार आहे. तसेच मुंबई-सिंधुदूर्ग रस्ता (Mumbai-Sindhudurg Road) हा ग्रीन फिल्ड करतोय. कोकणाच्या विकासासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचे शिंदे म्हणाले.

शिंदे पुढे म्हणाले, सातारा येथील तरुण नोकरीसाठी मुंबईला जातोय.
येथे विकासाची मोठी क्षमता आहे. मोठ्या प्रमाणात क्लस्टर शेतीत लोकांना एकत्र आणत आहोत.
बांबू लागवड मोठ्या प्रमाणात केली जाणार आहे. तसेच वनौषधीवरही मोठ्या प्रमाणात काम केले जाणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Cholesterol वाढल्यानंतर शरीराकडून मिळतात धोक्याचे संकेत, दुर्लक्ष करणे पडू शकते महागात

Protein | अंडी-मटण न खाता सुद्धा शरीराला मिळतील भरपूर प्रोटीन, मार्केटमधून खरेदी करा ‘ही’ ४ फळे