Cholesterol वाढल्यानंतर शरीराकडून मिळतात धोक्याचे संकेत, दुर्लक्ष करणे पडू शकते महागात

नवी दिल्ली : व्यस्त जीवनशैलीमुळे व्यायाम न करणे, जास्त तेलकट पदार्थ खाणे, इत्यादी कारणामुळे रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉल (Bad Cholesterol) वाढते. कोलेस्ट्रॉल वाढल्याने हाय ब्लड प्रेशर (High Blood Pressure), डायबिटीज (Diabetes), हार्ट अटॅक (Heart Attack), ट्रिपल वेसल डिसीज (Triple Vessel Disease) आणि कोरोनरी आर्टरी डिसीज (Coronary Artery Disease) चा धोका वाढतो. हाय कोलेस्ट्रॉलचे निदान ब्लड टेस्टद्वारे होते. परंतु याचे काही संकेत शरीरात दिसतात, ते जाणून घेऊया (High Cholesterol Warning Sign)…

कसे ओळखावे हाय कोलेस्ट्रॉलचे संकेत

१. हाय कोलेस्ट्रॉल (High Cholesterol) च्या स्थितीत शरीरातील नसा ब्लॉक होतात. हीच स्थिती पायांच्या नसांची देखील होते, ज्यामुळे शरीराच्या सर्वात खालच्या भागात ऑक्सिजन न पोहचल्याने पायाच्या पिंढरीमध्ये तीव्र वेदना होतात.

२. शरीरात वाईट कोलेस्ट्रॉलची लेव्हल वाढल्याने पायात पेटके येतात. काही वेळा रात्री झोपताना पायात तीव्र वेदना होतात. मात्र थोडावेळ उभे राहिल्यानंतर रक्तप्रवाह बरोबर होऊन वेदना दूर होतात.

३. वाढत्या कोलेस्ट्रॉलच्या सर्वात धक्कादायक लक्षणांपैकी एक म्हणजे पाय आणि नखांचा रंग बदलणे.
अनेकदा नखे पिवळी पडतात. पायांना रक्तपुरवठा योग्य प्रकारे होत नसल्याने असे घडते.

४. हिवाळ्यात पाय थंड पडणे हे सामान्य आहे. परंतु उन्हाळ्यात किंवा सामान्य तापमानातही पाय
अचानक थंड पडत असतील तर हे धोक्याचे लक्षण आहे. अशावेळी ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ramdas Athawale | आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजप सोबत युती करण्याचा रिपब्लिकन पक्षाचा निर्णय – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

Healthy Breakfast | वाढलेल्या वजनावर हल्ला करतील ‘हे’ 5 प्रकारचे हेल्दी ब्रेकफास्ट, पोटाची चरबी होईल गायब; सकाळी करा हे काम