Video : उपअभियंत्यावरील चिखलफेकप्रकरणी आमदार नितेश राणेंना अटक

कणकवली : पोलीसानामा ऑनलाइन – महाराष्ट्र माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा मुलगा आणि काँग्रेसचे आमदार नितेश राणे उपअभियंत्याला मारहाण, शिवीगाळ आणि चिखल फेकल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी नितेश राणे यांच्यासह ५० स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नितेश राणे आणि त्यांच्या ४०ते ५० समर्थकांवर कलम 353, 342, 332, 324, 323, 120(A), 147, 143, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला आहे. नितेश राणेंनीही पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. याप्रकरणी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांनी तक्रार दाखल केली आहे.

https://bit.ly/2NzjUUz 

मुंबई-गोवा महामार्गावर पावसाळ्यात होत असलेल्या चिखल आणि खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या रोषाचा फटका महामार्ग उपअभियंत्याला बसला. स्वाभीमानी संघटेनच्या संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी आणि आमदार नितेश राणे यांनी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना महामार्गावर चिखलाची आंघोळ घातली. महामार्गच्या दुरावस्थेस प्रकाश खेडेकर यांना जबाबदार धरून त्यांना चिखलाची आंघोळ घालण्यात आली.

आमदार नितेश राणे यांनी केलेल्या या कृत्याबद्दल त्यांना पश्चाताप झालेला दिसून येत नाही. पोलिसांनी अटक केल्यानंतर नितेश राणे यांनी आपल्यावर कोणतेही गुन्हे दाखल केले तरी घाबरत नसल्याचे सांगितले. या महामार्गासाठी लोकांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत. रस्त्याची अवस्था खराब असल्यामुळे आपल्याला असे करावे लागेल. अधिकाऱ्यांना धडा शिकवायचा होता. म्हणूनच असे कृत्य केल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे. तसेच येथून पुढे या कामावर मी वैयक्तीक लक्ष ठेवणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
https://twitter.com/ANI/status/1146769233969389568

सिनेजगत

मुंबईतील पावसाचा बॉलिवूडवर देखील ‘इम्पॅक्ट’, ‘या’ चित्रपटासह इतरांना ‘फटका’

जायरा वसीमसारखे अजिबात नाहीत ‘या’ ‘टॉप’ ४ बालिवूड अभिनेत्रींचे ‘विचार’

Video : अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत ‘बोल्ड’ सीन करताना ‘हा’ अभिनेता ‘आऊट ऑफ कंट्रोल’ !

बहुजननामा

अनुसूचित जातीमध्ये १७ ओबीसी जाती समाविष्ट करण्याचा योगी सरकारचा निर्णय बेकायदा

आगामी विधानसभेसाठी वंचित-काँग्रेस एकत्र आल्यास समीकरणे बदलतील

शहरातील सर्व बांधकामे तातडीने थांबवा – बाबा आढाव