Maharashtra Crime News | पोलीस निरीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल, पोलीस दलात खळबळ

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Crime News | धुळे जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (Dhule Police Crime Investigation Branch) तत्कालीन पोलीस निरीक्षक हेमंत पाटील (Police Inspector Hemant Patil) यांच्यावर रात्री उशिरा देवपूर पोलीस ठाण्यात (Devpur Police Station) विनयभंगाचा (Molestation Case) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलीस दलासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आणि ज्यांचे शोषण झाले त्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी आहे, तोच रक्षक भक्षक झाल्याची चर्चा जिल्ह्यात होत आहे. (Maharashtra Crime News)

धुळे जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांची नुकतीच धुळे जिल्हा सायबर सेल (Dhule Police Cyber Cell) प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांची नंदुरबार जिल्ह्यात बदली झाली. मागील काही दिवसांपासून त्यांचा एक अश्लिल व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. (Maharashtra Crime News)

याप्रकरणी एका महिलेने देवपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार हेमंत पाटील यांच्यावर आयपीसी 354 अ, 354 ब, 354 ड, 509, 506, 34 तसेच
आयटी अॅक्ट कलम 67, 67 ए नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळे जिल्हा पोलीस दलातील अधिकाऱ्यावर अशा प्रकारे गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

विमान तिकीट विक्रीचे काम देण्याच्या बहाण्याने साडेसहा लाखांची फसवणूक, दिघी परिसरातील प्रकार