Pune Crime News | विमान तिकीट विक्रीचे काम देण्याच्या बहाण्याने साडेसहा लाखांची फसवणूक, दिघी परिसरातील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | ऑनलाईन विमान तिकिट विक्री (Online Air Ticket Sales) करु दररोज पाच ते सात हजार रुपये कमावण्याचे आमिष दाखवून एका 51 वर्षाच्या व्यक्तीला सायबर चोरट्यांनी (Cyber Crime) 6 लाख 40 हजार रुपयांचा गंडा (Cheating Fraud Case) घातला. हा प्रकार 5 ते 14 सप्टेंबर दरम्यान बोपखेल येथे घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत अजित नरहर व्यवहारे (वय-51 रा. गणेशनगर, बोपखेल, ता. हवेली) यांनी दिघी पोलीस ठाण्यात (Dighi Police Station) फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार नंदीनी व गायत्री या टेलिग्राम धारक व्यक्ती, 94144XXXXX मोबाईल धारक हितेश लमडी, 90254XXXXX मोबाईल धारक सुर्या यांच्यावर आयपीसी 420, 406, आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना 1 सप्टेंबर रोजी नंदीनी नावाच्या टेलिग्राम धारकाने मेसेज पावठवून स्काय स्कॅनर कंपनीचे एजंट असल्याचे सांगितले. ही कंपनी ऑनलाईन विमान तिकिट विक्री करत असल्याचे फिर्यादी यांना सांगितले. दररोज ऑनलाईन काम केले तर पाच ते सात हजार रुपये मिळतील असे आमिष फिर्यादी यांना दाखवले. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी 6 लाख 92 हजार 123 रुपये जमा केले. पैसे घेतल्यानंतर फिर्यादी यांच्या बँक खात्यावर केवळ 51 हजार 146 रुपये पाठवले.
मात्र, त्यानंतर तिकीट विक्रीचे काम न देता तसेच पाठवलेले पैसे परत न करता 6 लाख 40 हजार 977 रुपयांची
आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

विजबिल भरण्याच्या बहाण्याने साडेतीन लाखांची फसवणूक, चिंचवड मधील प्रकार

पार्ट टाईम जॉबच्या बहाण्याने पुण्यातील तरुणाची फसवणूक

पुणे : फ्लॅट न देता 80 लाखांची फसवणूक, भल्ला इस्टेट प्रा. लि. च्या संचालकावर FIR