Maharashtra Crime News | नात्याला काळीमा! पोलीस कर्मचारी आणि सख्ख्या भावाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, संभाजी नगरमधील घटना

छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Crime News | पंधरावर्षीय अल्पवयीन मुलीवर एका पोलीस कर्मचाऱ्याने (Police Officer) आणि तिच्या सख्ख्या भावाने अत्याचार (Minor Girl Rape Case) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलगी गर्भवती झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. नात्याला काळीमा फासणारी ही घटना छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर तालुक्यात घडली आहे. (Maharashtra Crime News)

या प्रकरणातील आरोपी पोलीस कर्मचारी सुभाष होनाजी गांगुर्डे (Subhash Honaji Gangurde) आणि पीडितेचा भाऊ या दोघा नराधमांवर पॉक्सो कायद्यांतर्गत गंगापूर पोलीस ठाण्यात (Gangapur Police Station) गुन्हा दाखल केला आहे. पीडितेच्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर शहरात पीडितेच्या सख्ख्या भावाने पीडितेला जीवे मारण्याची धमकी (Threats to kill) देत शेतात व राहत्या घरात वेळोवेळी अत्याचार केला. तर, ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष होनाजी गांगुर्डे याने सुद्धा अल्पवयीन मुलीवर तिच्या घरात कोणी नसताना सहा महिन्यांपूर्वी बलात्कार (Rape Case) केला होता. पीडितेच्या फिर्यादीवरून या दोघांवर पॉक्सो व विविध कलमांतर्गत शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे.

पीडितेने सुरूवातीला सख्ख्या भावाचेच नाव सांगितल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
परंतु, नंतर पोलिसांना माहिती मिळाली की या प्रकरणात आणखी एक आरोपी असून तो पोलीस खात्यातील असल्याने पीडित तरूणी त्याचे नाव सांगण्यास घाबरत आहे.

मात्र, तिला धीर देऊन पोलिसांनी सर्व प्रकार उघडकीस आणला आणि दुसऱ्या आरोपीवर सुद्धा गुन्हा दाखल केला.
नातेवाईक असलेला पोलीस कर्मचारी गांगुर्डेने याने वेळोवेळी अत्याचार
केल्याची धक्कादायक माहिती नंतर पीडितेने दिली.

पीडित मुलगी गर्भवती झाल्याने घाबरून जाऊन तिने पोलिसांत तक्रार करण्याचे ठरवले.
यानंतर तिचा आरोपी भाऊ फरार झाला. परंतु, पोलिसांनी त्याला शोधून काढले आणि अटक केली.
दुसऱ्या आरोपीवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला लवकरच अटक होऊ शकते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Accident News | अपघाताचे सत्र सुरुच; हॉटस्पॉट ठरलेल्या नवले पुलाजवळ पुन्हा मालवाहू ट्रक उलटला

Pune Fire News | कात्रजमध्ये अग्निशमन दलाचे धाडसी कार्य; आगीमध्ये अडकलेल्या लहान मुलीचे वाचवले प्राण