Maharashtra Crime News | पुण्यातील मोक्का गुन्ह्यातील कुख्यात गुन्हेगारांना अमरावती पोलिसांकडून अटक

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Crime News | खुनाचा प्रयत्न (Attempted Murder) व खंडणीसाठी (Extortion Case) अपहरणाच्या (Kidnapping) गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी पुण्यातून पळून जाऊन अमरावती येथे आश्रय घेणाऱ्या दोन कुख्यात गुन्हेगारांना अमरावती पोलिसांनी (Amravati Police) अटक केली आहे. आरोपींना रविवारी (दि.12) रात्री आशियाड कॉलनी चौकातून एका कारमधून ताब्यात घेण्यात आले. आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) ताब्यात देण्यात आले आहे. आरोपी हे पुण्यातील कुख्यात गुन्हेगाराच्या टोळीतील असून त्यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. (Maharashtra Crime News)

विपुल उत्तम माझिरे (वय-26 रा. रावडे ता. मुळशी), प्रदीप उर्फ पंकज धनवे (वय-27 रा. सिंहगड रोड, दांडेकर पुल, दत्तवाडी पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर संतोष धुमाळ (रा. मुळशी, पुणे) हा आरोपी पोलिसांची चाहुल लागताच पळून गेला आहे. पौड पोलीस ठाण्यात (Paud Police Station) दाखल असलेल्या खुनाचा प्रयत्न व खंडणीसाठी अपहरणाच्या गुन्ह्यातील संतोष धुमाळ व इतर दोन साथीदार अमरावती येथे राहात असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी 9 नोव्हेंबर रोजी अमरावती पोलिसांना दिली होती. आरोपींना शोधण्याची जबाबदारी अमरावती पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एककडे देण्यात आली होती.

गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकाने आरोपींच्या शोधासाठी अमरावती शहरातील हॉटेल, लॉज तसेच आरोपींच्या संभाव्य राहण्याच्या ठिकाणांचा शोध घेतला. दरम्यान, 12 नोव्हेंबर रोजी रात्री साडेबारा च्या सुमारास स्थानिक गुंड सागर खिराडे याच्यासोबत अन्य शहरातील तीन व्यक्ती कारमधून फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. ती कार आशियाड कॉलनी चौकात ट्रेस झाली. सागर खिराडे हा त्याच्या कारसह दिसून आला. पोलिसांना पाहताच तो अंधाराचा फायदा घेऊन एका व्यक्तीसह पळून गेला. तर विपुल आणि प्रदीप हे दोन आरोपी गुन्हे शाखेच्या हाती लागले. (Maharashtra Crime News)

आरोपी दोन दिवसांपासून अमरावतीत

आरोपी हे दोन दिवसांपासून अमरावतीच्या शेगाव परिसरात राहत होते.
त्यांना अमरावती येथील गुन्हेगार सागर खिराडे याने आश्रय दिल्याची कबुली अटक केलेल्या आरोपींनी दिली.
पळून गेलेला संतोष धुमाळ व अटक आरोपी विपुल माझीरे हे मोक्का केसमधील आरोपी असून दोन ते तीन महिन्यापूर्वीच कारागृहातून सुटले होते.
ही कारवाई पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी (Police Commissioner Navin Chandra Reddy)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले (Sr PI Asaram Chormale)
व सहायक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे (API Manish Wakode) यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MCOCA Action | खंडणी मागणाऱ्या अतुल धोत्रे व त्याच्या 2 साथीदारांवर ‘मोक्का’!
पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 84 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA