राज्यात ‘तोक्ते’ चक्रीवादळ ! पोलीस महासंचालक चंदीगडला सुट्टीवर?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  महाराष्ट्रात तोक्ते चक्रीवदाळाचे संकट असताना पोलीस महासंचालक संजय पांडे हे राज्याबाहेर सुट्टीवर गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. संजय पांडे हे कोणाचीही परवानगी न घेता चंदीगडला गेल्याची माहिती मिळत आहे. यावरुन शिवसेनेने आक्षेप घेत सवाल उपस्थित केला आहे. राज्यात वादळामुळे हाय अलर्ट जारी करण्यात आला असताना पोलीस महासंचालक चंदीगडला केसे गेले ? असा सवाल शिवसेने उपस्थित केला आहे. संजय पांडे यांच्या वर्तवणुकीवर शिवसेना नाराज असून कारवाईची मागणी केली जात आहे.

राज्यात तोक्के वादळाचं संकट असताना मुंबई, कोकण परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. असे असताना पोलीस महासंचालक पदाची धुरा सांभाळणारे संजय पांडे यांनी गृहमंत्र्यांची परवानगी घेतली नाही, ते विनापरवाना चंदीगडला गेलेच कसे ? असा सवाल शिवसेनेने केला आहे. राज्याचे गृहमंत्री ज्यावेळी या वदाळाचा आढावा घेण्यासाठी संजय पांडे यांना फोन करतात. त्यावेळी त्यांना समजते की संजय पांडे हे मुंबईतच नाहीतर महाराष्ट्रामध्ये देखील नाहीत. ते चंदीगड येथे असल्याची माहिती मिळते.

संजय पांडे हे चंदीगडला विनापरवाना गेल्यानंतर आता वेगवेगळी कारणे सांगण्यात येत आहेत. संजय पांडे यांच्या जवळच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात येते की, त्यांनी संबंधित विभागाला तशी माहिती दिली होती आणि अधिकृत सुट्टी मिळाल्यानंतरच ते चंदीगडला गेले आहेत.

संजय पांडे दिल्लीत काही लोकांना भेटले ?

पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी दोन दिवसांमध्ये दिल्ली आणि चंदीगड येथील काही लोकांच्या भेटी घेतल्या आहेत आणि त्या येत्या काळात महाविकास आघाडीवर आणि राज्याच्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या असतील अशी चर्चा सध्या सुरु झाली आहे. त्यामुळे संजय पांडे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी शिवसेनेकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात शिवसेनेकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आले नसले तरी आज संध्याकाळी किंवा उद्या पर्यंत शिवसेना आपली अधिकृत बाजू मांडेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.