Maharashtra Government | राज्यातील खासगी कार्यालये ‘या’ अटींवर 24 तास सुरु राहणार

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  कोरोनाची दुसरी लाट (Corona virus) आता ओसरू लागली आहे. त्यामुळे शासनाने (Maharashtra Government) निर्बंध कमी करण्यास सुरु केले आहे. आणखी एका सुधारित आदेश जारी करत सर्व आस्थापना आणि कार्यालये उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. या आदेशात काही अटींवर खासगी कार्यालये (Private offices) 24 तास सुरू ठेवण्याची मुभा राज्य सरकारकडून (Maharashtra Government) देण्यात आली आहे.

‘ब्रेक द चेन’ (‘Break the chain) अंतर्गत राज्य सरकारने (State Government) अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. अनेक निर्बंध शिथिल करण्याबरोबरच अनेक प्रकारच्या सवलतीही देण्यात आलेल्या आहेत. नवीन नियमानुसार कोरोना लसीचे (Corona vaccine) ज्या नागरिकांनी दोन डोस (Two dose) घेतले आहेत, व हे डोस घेऊन 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे.
अशा नागरिकांसाठी सर्वच बाबतीत कवाडे खुली झाली आहेत.
15 ऑगस्टपासून सुधारित आदेशाच्या अनुषंगाने ज्या मार्गदर्शक सूचना (Guidelines) निश्चित करण्यात आल्या आहेत त्याची अंमलबजावणी राज्यभरात करण्यात येणार आहे.
कार्यालय, औद्योगिक व सेवाविषयक आस्थापणांना या नव्या आदेशात मोठा दिलासा मिळाला आहे.
काही अटी घालण्यात आल्या असल्या तरी सर्व कार्यालये उघडण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

 

कार्यालयांसाठी अशा आहेत सूचना :

– सर्व शासकीय व निमशासकीय आस्थापनांचे कर्मचारी, बँक कर्मचारी, रेल्वे व म्युनिसिपल कर्मचारी व व्यवस्थापन यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण (Covid preventive vaccination) प्राधान्याने पूर्ण करण्यात यावे.

– ज्या खासगी व औद्योगिक आस्थापना पूर्ण क्षमतेने सुरु ठेण्यासाठी त्यांच्या कर्मचाऱ्यांचे व व्यवस्थापनांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झालेले पाहिजे.

– गर्दी टाळण्यासाठी सर्व आस्थापनांनी शक्यतो विविध सत्रात कर्मचाऱ्यांना बोलावून कामाचे व्यवस्थापन करावे.
याशिवाय ‘वर्क फ्रॉम होम’ (‘Work from home) शक्य असल्यास घरूनच काम करण्याची मुभा द्यावी.

– कार्यालयात काम करणे आवश्यक असल्यास कर्मचाऱ्यांचा गर्दीच्या वेळी प्रवास टाळणे शक्य होईल अशा प्रकारे कार्यालयीन वेळेचे व्यवस्थापन करण्यात यावे.

– खासगी कार्यालयांना 24 तास सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे.
मात्र, त्यांना एका सत्रात कार्यालयातील एकूण कर्मचारी संख्येच्या 25 टक्के उपस्थिती मर्यादित करणे आवश्यक राहणार आहे.

– या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, साथरोग अधिनियम आणि भारतीय दंडसंहिता (IPC) 1860 मधील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल.

 

Web Title : Maharashtra Government | private offices in maharashtra can now be open 24 hours guidelines issued

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | कमिन्स इंडियाच्या HR सह तत्कालीन पदाधिकाऱ्यांवर FIR दाखल

Netherland Cucumber | काकडीची लागवड करून कमावले 8 लाख; जाणून घ्या स्टोरी

MHT-CET 2021 | एमएचटी CET परीक्षेची प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरु – मंत्री उदय सामंत