Maharashtra ISIS Module Case | NIA ची पुण्यात मोठी कारवाई ! महाराष्ट्र इसिस मॉड्युलप्रकरणी कोंढव्यातील डॉक्टरला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra ISIS Module Case | देशविघातक कृत्याप्रकरणी महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) आणि विविध राष्ट्रीय तपास संस्थांकडून कारवाई केली जात आहे. आता आणखी एक मोठी कारवाई पुण्यात करण्यात आली आहे. ISIS महाराष्ट्र मॉड्युल प्रकरणात (Maharashtra ISIS Module Case) राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयए National Investigation Agency (NIA) ने गुरुवारी पुण्यातील कोंढवा (Kondhwa in Pune) परिसरातून एकाला अटक (Arrest) केली आहे.

पुणे शहरातील कोंढवा परिसरात एनआयए ने छापा टाकून ही कारवाई केली आहे. या कारवाईत डॉ. अदनानली सरकार Dr Adnanali Sarkar (वय-43) याला अटक केली आहे. एनआयएने सरकार याच्या कोंढव्यातील घरावर छापा टाकून इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स (Electronic Gadgets) आणि ISIS शी संबंधित अनेक दस्तावेज जप्त (Documents) केले आहेत. हा आरोपी तरुणांना दहशतवादी कारवायांसाठी (Terrorist Activities) भरती करत होता, अशी माहिती एनआयएच्या तपासात समोर आली आहे. (Maharashtra ISIS Module Case)

आरोपीने इस्लामिक स्टेट (IS)/इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हंट
(ISIL)/ इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया
(ISIS)/Daish/ISlamic State in Khorasan सारख्या वेगवेगळ्या नावाने
ओळखल्या जाणाऱ्या ISIS च्या दहशदवादी कारवायांमध्ये मदत केल्याचे समोर आले आहे.
एनआयएच्या तपासानुसार, आरोपी अदनानली सरकार भारत सरकार विरोधात
(Government of India) दहशतवादी कृत्य करण्यासाठी विविध दहशतवादी संघटनांना मदत करत होता.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Pune Expressway | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दरडी हटवण्यासाठी पुन्हा ब्लॉक,
उद्या (गुरूवारी) ‘या’ वेळेत प्रवास टाळा