Maharashtra Kesari | मला देशासाठी मेडल आणायचं आहे, महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकल्यानंतर सिकंदर शेखची प्रतिक्रिया

सिकंदर शेखने गतविजेत्या शिवराजला दाखवलं अवघ्या 22 सेकंदात आस्मान (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Kesari | यावर्षीचा महाराष्ट्र केसरीचा मान पैलवान सिकंदर शेख (Sikandar Shaikh) याने पटकावला आहे. गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेला चितपट करत सिकंदर शेख याने यंदाचा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला आहे. मानाची चांदीची गदा देत सिकंदर शेखचा सन्मान करण्यात आला. पुणे जिल्ह्यातील फुलगाव येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली. (Maharashtra Kesari)

सिकंदर शेखने अवघ्या 22 सेकंदात महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकला. अवघ्या पाच सेकंदात झोळी डावावर सिकंदर शेख महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला. सिकंदर हा 66 वा महाराष्ट्र केसरी किताब जिंकणारा पैलवान ठरला. या स्पर्धेत 36 जिल्हा आणि 6 महानगरपालिका असे 42 संघ भिडले. एका कुस्ती संघात गादी विभागातील 10 आणि माती विभागातील 10 असे एकूण 20 कुस्तीगीर 2 कुस्ती मार्गदर्शक आणि 1 संघ व्यवस्थापक असे एकूण 23 जणांचा सहभाग होता. या कुस्ती स्पर्धेत 840 कुस्तीगीर 84 कुस्ती मार्गदर्शक आणि 42 व्यवस्थापक, 80 पंच आणि 50 पदाधिकारी असे एकूण 1100 जणांचा सहभाग होता. (Maharashtra Kesari)

कुस्ती जिंकल्यानंतर सिकंदर शेख म्हणाला, मागच्या वर्षीसुद्धा मीच महाराष्ट्र केसरी होतो. आणि यंदाही मीच आहे. मागच्या वर्षी काही गोष्टी घडल्याने स्पर्धा जिंकू शकलो नाही. मात्र, यावेळी मी आणखी तयारीने उतरलो होतो. सहा ते सात महिने मी कुस्तीची तयारी करत होतो. महाराष्ट्र केसरी हे माझं अंतिम ध्येय नाही. मी माझं वजन वाढवलं आहे. मला देशासाठी मेडल आणायचं आहे, अशी प्रतिक्रिया सिकंदर शेख याने दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Kesari | सिकंदर शेख नवा महाराष्ट्र केसरी! प्रतिस्पर्धी शिवराज राक्षेवर अवघ्या साडेपाच सेकंदात मात

Diwali Pahat In Yerawada Jail | येरवडा कारागृहातील कैद्यांच्या सुरेल आवाजात ‘दिवाळी पहाट’